अद्धभूत नजारा! चंद्रग्रहणासोबत आकाशात दिसणार हंटर मून; गुरु ग्रह देखील असणार जवळ
2023 सालातलं शेवटचं चंद्रग्रहण 28 ऑक्टोबरला आहे. यासह आकाशात एक अद्भूत नजारा पहायला मिळणार आहे.
Lunar Eclipse 2023: 2023 या वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण 28 ऑक्टोबरला होणार आहे. हे चंद्रग्रहण खगोलप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. चंद्रग्रहणासोबत आकाशात हंटर मून दिसणार आहे. विशेष म्हणजे गुरु ग्रह देखील पृथ्वीच्या जवळ येणार आहे. यामुळे अवकाशात अद्भूत नजारा पहायला मिळणार आहे.
28 ऑक्टोबरला शनिवारी चंद्रग्रहण होणार आहे. यावर्षातलं हे शेवटचं चंद्रग्रहण असून भारतात पाहता येणार आहे. रात्री 1वाजून 6मिनिटं ते रात्री 2 वाजून 22मिनिटांपर्यंत हे चंद्रग्रहण असेल. 2023 नंतर पुढचे चंद्रग्रहण हे 2025 मध्ये असमार आहे.
खगोलप्रेमींसाठी पर्वणी
28 आणि 29 ऑक्टोबर रोजी चंद्र पृथ्वीच्या सावलीतून जाणार आहे. भारतासह रशिया, इटली, जर्मनी आणि ब्रिटनसह युरोपमध्ये आणि दक्षिण आफ्रिका, इजिप्त आणि अल्जेरियासारख्या देशांमध्ये आंशिक चंद्रग्रहण म्हणून ओळखले जाणार आहे. या ग्रहणासोबतच आकाशात आणखी एक नजारा पाहायला मिळणार आहे. चंद्रग्रहणासोबत हंटर मून पहायला मिळणार आहे. अमेरिका आणि ब्रिटनमधील काही देशांमध्ये हंटर मूनही दिसणार आहे.
हंटर मून म्हणजे काय?
ऑक्टोबर महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला दिसणारा फुल मून हा हंटर म्हणून ओळखला जातो. या दिवशी चंद्र नेहमीपेक्षा मोठा दिसतो. पौर्णिनंतर देखील काही दिवस हा हंटर मून पहायला मिळणार आहे. या वर्षातील दोन पौर्णिमा अजून शिल्लक आहेत. 27 नोव्हेंबर आणि 28 नोव्हेंबरला या पौर्णिमा होणार आहेत.
गुरु ग्रह पृथ्वीच्या जवळ येणार
28 ऑक्टोबरला हंटर मून सह आणखी एक खगोलीय घटना घडणार आहे. हंटर मूनसह गुरु ग्रह पृथ्वीच्या जवळ येणार आहे. चंद्रोदयानंतर गुरु ग्रह दिसणार आहे. प्रत्यक्षात गुरु ग्रह चंद्रापासून 1500 पट दूर आहे. हंटर मूनसह गुरु ग्रह जवळून पाहता येणार आहे.