वॉशिंग्टन : New York Storm Ida : अमेरिकेत (America) इडा चक्रीवादळाने (Storm Ida) जोरदार तडाखा दिला आहे. या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका न्यूयॉर्कला (New York Flood) बसला आहे. येथील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. या चक्रीवादळामुळे मुसळधार आणि अतिवृष्टीप्रमाणे पाऊस कोसळत आहे. सोसाट्याच्या वाऱ्यांसह कोसळणाऱ्या पावसामुळे न्यूयॉर्कमध्ये भयानक पूरस्थिती निर्माण झाली आहे. इडा चक्रीवादळामुळे आतापर्यंत 44 जणांचा मृत्यू झाला आहे.(44 Dead As Flash Floods Hit New York Area )


Cyclone Ida : न्यूयॉर्क शहर बुडाले; मेट्रो रेल्वे मार्ग पाण्याखाली, रस्त्यावर तरंगणाऱ्या गाड्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुसळधार पावसामुळे पूर्व अमेरिकेत (America) पूरस्थिती गंभीर निर्माण झाली आहे. विशेषतः न्यूयॉर्क (New York ) आणि न्यू जर्सी (New Jersey) ही शहरे सर्वाधिक प्रभावित झाली आहेत. येथील रस्ते तलावाप्रमाणे झाले आहेत. भुयारी मार्गावर पुराचे पाणी घुसल्याने हे मार्ग तुडुंब भरले आहेत. अनेक भागात वीजपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला झाल्याने शहरातील अनेक भाग अंधारात आहेत. एएफपी या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, वादळानंतर मुसळधार पावसामुळे न्यूयॉर्कमध्ये पूरसदृश परिस्थिती आहे. (New York City flood) मेट्रो लाईन पाण्याखाली गेल्या आहेत आणि कार रस्त्यावर तरंगताना दिसत आहेत. आतापर्यंत किमान 41 लोकांचा मृत्यू झाला आहे.


मुसळधार पावसाने परिस्थिती हाताबाहेर



प्रचंड पाऊस आणि पुराचे पाणी घुसल्याने येथील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. मदतकार्यात अडथळा निर्माण होत आहे. बिघडत चाललेली परिस्थिती पाहता न्यूयॉर्क आणि न्यू जर्सीमधील सामान्य लोकांना घराबाहेर पडू नका, असे आवाहन करण्यात आले आहेत. दोन्ही प्रांतांमध्ये आपात्कालीन वाहने वगळता इतर कोणत्याही वाहनास रस्त्यावर परवानगी नाही. पुरात कार वाहून गेल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याचवेळी, अपार्टमेंटच्या तळघरातून नऊ लोकांचे मृतदेह सापडले आहेत. पेनसिल्व्हेनियामध्ये तीन मृत्यू नोंदवले गेले आहेत. सर्वत्र पाणी दिसत आहे. मेट्रो स्टेशनला धबधब्याचे स्वरुप वाहत आहेत.


तीन विमानतळ बंद, उड्डाणे रद्द


वाईट हवामानामुळे न्यू जर्सीतील ट्रान्झिट रेल्वे सेवा पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. त्याचबरोबर नेवार्क लिबर्टी विमानतळावर पाणी भरल्याने सर्व प्रवासी उड्डाणे बंद करण्यात आली आहेत. लागार्डिया आणि जेएफके विमानतळ तसेच नेवार्क येथील शेकडो उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. पावसाच्या पाण्याने टर्मिनल बुडाल्याने विमान सेवेवर याचा परिणाम झाला आहे.


दुसरीकडे, न्यूयॉर्कमध्येही प्रशासनाने भुयारी सेवा बंद केली आहे. भुयारी मार्ग पुराच्या पाण्याने भरला आहे, आत अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, हवामान विभागाने चक्रीवादळ आणि पावसाचा धोका कायम असल्याचे म्हटले आहे. तसेच पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे, असे म्हटले आहे.


न्यूयॉर्कमध्ये विक्रमी पाऊस


न्यूयॉर्कमध्ये विक्रमी पाऊस झाला आहे. न्यूयॉर्क शहरासाठी अभूतपूर्व फ्लॅश फ्लड आपात्कालीन घोषणा केली आहे. रस्ते नद्यांप्रमाणे दिसून येत आहेत. मेट्रो रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. मेट्रो ट्रॅक आणि प्लॅटफॉर्म पाण्याखाली गेले आहेत. गेल्या 50 वर्षांत इतका पाऊस कधीच पाहिला नाही, अशी एकाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. 


प्रचंड वेगाने आलेल्या इडा चक्रीवादळाने मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडलेली आहेत. वॉशिंग्टनपासून 30 मैल (50 किलोमीटर) अन्नापोलिसमध्ये या वादळाने झाडे उखडून टाकली असून विजेचे खांब पाडले. एनडब्ल्यूएसने इशारा दिला आहे की, चक्रीवादळाचा धोका कायम राहणार आहे.