मुंबई: हल्ली सोशल मीडियावर अनेक जोडप्यांकडून 'कपल गोल्स' अशा कॅप्शनखाली फोटो शेअर केले जातात. यामधून एकमेकांविषयीचे प्रेम दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल ठरत असून नेटकऱ्यांनी उचलून धरल्यामुळे तो 'कपल गोल्स'च्या यादीत जाऊन बसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भूतानचे माजी पंतप्रधान त्सेरिंग टॉबगे यांनी आपल्या पत्नीसोबतचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला होता. यामध्ये त्सेरिंग टॉबगे यांनी आपल्या पत्नीचे पाय चिखलात खराब होऊ नयेत म्हणून तिला पाठीवर उचलून घेतल्याचे दिसत आहे. 


हा फोटो ट्विटरवर पोस्ट झाल्यानंतर अनेकांना भलताच आवडला. त्यामुळे नेटकऱ्यांनी 'कपल गोल्स', 'हजबंड गोल्स' अशा कॅप्शन्सनी हा फोटो व्हायरल करायला सुरुवात केली. त्यामुळे सध्या इंटरनेटवर या फोटोची प्रचंड चर्चा आहे.