मुंबई : आपल्यापैकी असे अनेक लोक आहेत, ज्यांना आपल्या आयुष्यात आपण काय करतो आणि कुठे जातो हे सोशल मीडियावर अपडेट करण्याची सवय आहे. अमेरीकेतील एका महिलेला देखील अशीच सवय होती. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट अपडेट केली आणि नंतर तिचा मृत्यू झाला. ज्यानंतर हे प्रकरण सोशल मीडियावर वाऱ्यासारखं पसरलं. वास्तविक, पत्नीने पतीपासून घटस्फोट घेण्याविषयी सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती. पण कदाचित तोपर्यंत या महिलेला कल्पनाही नव्हती की ही पोस्ट आपल्या जीवाची शत्रू बनणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सानिया खानने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करता, जो तुमच्यासाठी खूप निष्काळजी असतो तेव्हा तुम्हाला खूप वाईट वाटतं.


ही बातमी नवऱ्यापर्यंत पोहोचताच त्याने बायकोला भेटण्यासाठी हजार किलोमीटरहून अधिक प्रवास केला. सानियाने टिकटॉकवर घटस्फोट घेण्याबाबत एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यामध्ये तिने त्यांच्या नात्यात आलेल्या त्रासाबद्दल सांगितले होते.


नात्यात सुरू असलेल्या कुरबुरीमुळे नवरा राहिल अहमद जेव्हा सानियाला भेटला, तेव्हा त्याने सानियाला गोळ्या घालून तिचा जीव घेतला. एवढेच नाही तर बायकोची हत्या केल्यानंतर नवऱ्याने स्वतःचाही जीव घेतला. दोघांच्या डोक्यात गोळी लागल्याचे सांगण्यात येत आहे. सानिया खानने तिच्या पोस्टमध्ये घटस्फोटाबाबत लोकांच्या रूढीवादी विचारसरणीचाही उल्लेख केला होता.


खरंतर सानियाचा नवरा तिला मारण्यासाठी इतक्या दुरवरुन आला होता. जर सानियाने सोशल मीडियावर तिच्या घटस्फोटाबद्दल सांगितले नसते, तर कदाचित त्यांच्यातील हे भांडण कधीच कोणाच्या लक्षात आले नसते.