Hyderabad Girl Killed In London: लंडन येथे राहणाऱ्या भारतीय वंशीय तरुणीची चाकू भोसकून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. कोंतम तेजस्वी असं या तरुणीचे नाव असून ती मुळची हैदराबाद येथील आहे. उच्च शिक्षणासाठी ती लंडन येथे गेली होती. तिथे ती तिच्या मित्रांसोबत राहत होती. तेजस्वीच्या रुममेटने तिच्यावर व तिच्या एका मैत्रिणीवर चाकूने वार केले. आत तेजस्वी गंभीररित्या जखमी झाली होती. मंगळवारी वेम्बली येथील नील क्रिसेंट येथे ही घटना घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूचना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. तसंच, तेजस्वीसह  जखमी झालेल्या तिच्या मैत्रिणीला रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र, पोलिसांनी तेजस्वीला तपासून मृत घोषित केले आहे. पोलिसांनी आरोपीता अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करुन पुढील कारवाई सुरू केली आहे. 


एका वृत्तसंस्थेनुसार, पोलिस अधिकाऱ्यांनी उत्तर लंडनमध्ये असलेल्या नील क्रिसेंट या परिसरातून स्थानिक वेळेनुसार सकाळी दहाच्या सुमारास एक फोन आला होता. त्यावेळी फोनवरील व्यक्तीने दोन मुलींवर चाकूने हल्ला केल्याची माहिती त्यांना दिली. सूचना मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले व दोन्ही तरुणींना रुग्णालयात दाखल केले. मात्र यात तेजस्वीचा मृत्यू झाला होता तर दुसऱ्या तरुणीवर उपचार सुरु आहेत. 


तेजस्वीवर हल्ला करणारा तरुण हा ब्राझीलचा असल्याचं बोललं जात आहे. जवळपास एक आठवड्यापूर्वीच तो अन्य विद्यार्थ्यांसोबत भाडेकरु म्हणून राहायाला आला होता. एका क्षुल्लक कारणावरुन झालेल्या भांडणातून ही घटना घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तेजस्वी एक वर्षांपूर्वीच लंडनमध्ये शिक्षणासाठी गेली होती. ती मास्टर ड्रिग्रीचा आभ्यास करत होती.


स्थानिक पोलिसांकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, घटनास्थळावरुन एक २४ वर्षीय तरुणाला व २३ वर्षांच्या तरुणीला संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलं आहे. मात्र, तरुणीलानंतर सोडून देण्यात आलं. त्यानंतर आणखी एका २३ वर्षांच्या संशयिताला ताब्यात घेतलं. आहे. 


डिटेक्टिव्ह चिफ इन्स्पेक्टर लिंडा ब्रेडले या संपूर्ण प्रकरणात प्रतिक्रिया दिली आहे. प्रकरणाचा तपास जलद गतीने करण्यात येत आहे. नागरिकांनी वेळेत पोलिसांना माहिती दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आम्ही आरोपीला अटक केली असून तो आता तुरुंगात आहे. या हत्या प्रकरणात तपास करण्यासाठी आम्ही एक स्वतंत्र पथक निर्माण केले आहे. त्यांच्याकडून या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत आहे. लवकरच सगळी माहिती देण्यात येईल.