मुंबई : कोरोनावर मात करणारी लस शोधण्यास शास्त्रज्ञांना अद्याप यश आले नाही. यावर पर्याय म्हणून जास्तीत जास्त कोरोना चाचणी भारतात केल्या जात आहेत. यामुळे कोरोना रुग्ण आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होतेय. कोरोनाची लक्षण आढळल्यास त्या व्यक्तीस क्वारंटाईन केले जातंय.  काही महिन्यांनी यावर लसं शोधली जाईल. पण योग्य ती काळजी न घेतल्यास ठराविक धोका कायम राहील असे संशोधनातून समोर आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे.


संक्रमित मृतदेह 



 
एका संक्रमित मृतदेहामार्गे डॉक्टरांना कोरोना संसर्ग झाल्याची घटना थायलंडमधून समोर आली. शवागरातील तंत्रज्ञ, अतिंम संस्कारात सहभागी झालेल्या व्यक्तींनी याची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे.


यकृत आणि हृदयावर परिणाम 


कोरोनाच्या रुग्णांवर मोठ्या काळापर्यंत राहणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला. रुग्णालयात भरती असलेल्यांच्या ३४ रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली. ही लोकं कोरोना प्रादुर्भावातून मुक्त होत होते. यातील अनेकांचे शरीर पहील्याप्रमाणे सामान्य झाले नसल्याचे दिसून आले.


पेशींना धोका 


रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास उपयुक्त असणाऱ्या पेशी कोरोनामुळे निष्क्रिय होत असल्याचे संशोधनातून निदर्शनास आले.


टी पेशी संक्रमित करण्याची क्षमता सार्स SARS मध्ये नव्हती. पण कोरोना एचआयव्हीप्रमाणे नुकसान पोहोचवत असल्याचे शांघाईच्या विश्वविद्यालयात केलेल्या संशोधनात निष्पन्न झाले. 


हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हृदयाचे ठोके अनियमित करते. अमेरिकतेली काही डॉक्टर हे औषध साठवून ठेवत असल्याचे दिसून आले.