Imran Khan: `...तर मी वाचलोच नसतो`, हल्ल्यानंतर पहिल्यांदाच इम्रान खान यांचा मोठा गौप्यस्फोट!
Pakistan News : इम्रान खान यांनी (Imran Khan Press Conference) आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी मोठा खुलासा केला आहे. `माझ्यावर हल्ला होणार...`
Imran Khan Press Conference : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्यावर गुजरानवालामधील रॅलीमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या गोळीबारात इम्रान खान जखमी (Imran Khan attacked) देखील झाले होते. त्यानंतर पाकिस्तानात एकच गोंधळ उडाल्याचं पहायला मिळतंय. पाकिस्तानातून संतप्त प्रतिक्रिया येत असल्याचं पहायला मिळताच आता इम्रान खान यांनी (Imran Khan Addressed The Nation) पाकिस्तानच्या देशवासियांना संबोधित केलं.
इम्रान खान यांनी (Imran Khan Press Conference) आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी मोठा खुलासा केला आहे. माझ्यावर हल्ला होणार, हे मला आधीच माहिती होतं, असं इम्रान खान यांनी म्हटलं आहे. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.
मी सामान्य लोकांमधून आलोय, माझा पक्ष लष्करी आस्थापनाखाली बनलेला नाही. मी 22 वर्षे संघर्ष केला, असंही इम्रान खान (Imran Khan Update) म्हणाले आहेत. बंद दाराआड चार जणांनी मला मारण्याचा कट रचला. माझ्यासोबत एक व्हिडीओ आहे, मला काही झाले तर तो व्हिडीओ रिलीज केला जाईल, असा गौप्यस्फोट देखील त्यांनी यावेळी केला आहे.
दरम्यान, अचानक माझ्या पायात गोळ्या लागल्या आणि मी खाली पडू लागलो. तिथं दोन जण होते, जर ते नसते तर मी वाचलो नसतो, असंही ते यावेळी म्हणाले आहेत. इम्रान खान यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता देश विदेशातून विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे.