स्वातंत्र्यदिनानिमित्त बनवला जगातला सगळ्यात महागडा केक
भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दुबईच्या ब्रॉडवे बेकरीनं जगातला सगळ्यात महागडा केक बनवला आहे.
दुबई : भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दुबईच्या ब्रॉडवे बेकरीनं जगातला सगळ्यात महागडा केक बनवला आहे. या केकची किंमत तब्बल ४० हजार डॉलर्स म्हणजेच २५ लाख रुपयांच्या आसपास आहे. या केकमध्ये सोन्याचं खाद्यतेल वापरण्यात आलं आहे.
आमीर खानच्या दंगल चित्रपटाच्या थीमवर हा केक बनवण्यात आला आहे. या केकमध्ये महावीर फोगट यांची भूमिका साकारलेला आमीर खान तसंच गीता आणि बबिता फोगट दाखवण्यात आल्या आहेत. गीता फोगटनं २०१०सालच्या कॉमनवेल्थ खेळात मिळवलेल्या गोल्ड मेडलचीही प्रतिकृती या केकमध्ये लावण्यात आली आहे. या मेडलसाठी ७५ ग्रॅम सोन्याचं खाद्यदेल वापरण्यात आलंय. हा केक बनवण्यासाठी बेकरीला साडेतीन आठवडे लागले. ४ फूट लांब असलेल्या या केकचं वजन ५४ किलो आहे.
असा बनला सगळ्यात महागडा केक