पॅरीस: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फ्रान्सचे नवे राष्ट्रपतींनी आश्वासन दिलं आहे की, दहशतवादाविरोधील युद्धामध्ये फ्रान्स भारतासोबत उभा राहिल. दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पीएम मोदी फ्रान्समध्ये होते. त्यांनी फ्रान्सचे नवे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रों यांची भेट घेतली.


पॅरीसमध्ये वाढता दहशतवाद आणि ट्रंप यांच्या पॅरिस करारामधून माघार यामुळे या दोन्ही देशांच्या प्रमुखांची भेट महत्त्वाची मानली जाते आहे. भेटीमध्ये दोन्ही नेत्यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान मॅक्रो यांनी म्हटलं की, दहशतवादाशी निपटण्यासाठी चर्चा झाली. मॅक्रोंनी फ्रान्सकडून भारताला संपूर्ण समर्थन असल्याचा विश्वास दिला.