मुंबई : स्पायडरमॅन चित्रपटाची नागरीकांमध्ये भलतीच क्रेझ आहे.अनेकांना त्याचा हा ड्रेस घालून रस्त्यावर फिरायला आवडते. मात्र या घटनेत स्पायडरमॅन बनन एका तरूणाला चांगलचं महागात पडलंय. या तरूणाला तेथील स्थानिक प्रशासनाने 4 हजार डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार 2.25 लाखांचा दंड ठोठावला.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंगापूरमध्ये 19 वर्षीय कोत्रा ​​वेंकट साई रोहनकृष्ण या भारतीय वंशाच्या तरुण स्पायडरमॅन बनला होता. नवीन वर्षाच्या पुर्वसंध्येला त्याने हे गेटअप केले होते. नवीन वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात तो नागरीकांमध्ये सामील झाला होता. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ त्याच्या मित्रांनी युट्यूबवर शेअर केला होता.मात्र असं करण त्याला चांगलचं महागात पडलंय.   


एका इंग्रजी वृत्तपत्राच्या बातमीनुसार, कोत्रा ​​वेंकट साई रोहनकृष्ण त्याचे तीन मित्र या नवीन वर्षाच्या पार्टीला जमले होते. या पार्टीत रोहनकृष्णने स्पायडरमॅनचा ड्रेस घालत नागरीकांशी संवाद साधला. या संबंधित व्हिडिओ जेव्हा युट्युबवर अपलोड झाला.त्यावेळी स्थानिक प्रशासनाने हा व्हिडिओ पाहून कोरोना नियमांचे उल्लघन केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई केली. 4 हजार सिंगापूर डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार 2.25 लाखांचा दंड ठोठावला.  


कोर्टाची पायरी चढायला लावली 


 जेरेमी बिन या फिर्यादीने न्यायालयातही याप्रकरणी याचिका दाखल केली होती. या याचिकेत  रोहनकृष्णाचे दोन मित्र, ग्लॅक्सी लू झुआन मिंग, ली हर्न त्सिंग आणि भारतीय वंशाचे आकाश यांना व्हिडिओ बनवल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. कोरोनाचे निर्बंध असताना मास्क न घालता सार्वजानिक ठिकाणी वावरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यामुळे 
कोविड-19 च्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळल्यास 10,000 सिंगापूर डॉलर्सचा दंड, सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा दोन्ही ठोठावण्याची तरतूद करण्यात आली होती. मात्र त्याला 4 हजार सिंगापूर डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला