नवी दिल्ली : उत्‍तर प्रदेशमधील कानपूर येथील राहणाऱ्या एका शिख कुटुंबातील व्यक्तीने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या तुकडीत स्थान मिळवलं आहे. अंशदीप सिंह भाटिया असं या जवानाचं नाव आहे. 1984 मध्ये झालेल्या दंगलीने त्यांच्या कुटुंबाला यातना दिल्या. यानंतर संपूर्ण कुटुंबिय अमेरिकेला गेलं. यानंतर मेहनतीच्या जोरावर अंशदीप यांनी हे स्थान मिळवलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


अंशदीप सिंह भाटिया यांचं संपूर्ण कुटुंब कानपूरला राहत  होतं. शिख दंगलीमध्ये त्यांनी कुटुंबातील 2 व्यक्तींना गमवल्यानंतर त्यांनी अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला. कानपूर येथून लुधियानाला आल्यानंतर त्यांच्या देवेंद्र सिंह यांचा विवाह झाला. अंशदीप सिंह भाटिया हा त्यांचा मुलगा आहे. अंशदीपचा जन्‍म लुधियानामध्ये झाला. अमेरिकेला गेल्य़ानंतर अंशदीपने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षा गार्डमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. 



राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी असलेल्या जवानांना साध्या पोशाखामध्ये राहावं लागतं. अंशदीप शिख होते. त्यामुळे त्यांना अनेक समस्या आल्या. ज्यावेळी अशंदीप यांना काही अटी सांगण्यात आल्या तेव्हा त्यांनी कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांना न्याय मिळाला.