नवी दिल्ली : जालियनवाला बाग हत्याकांडाचा सूड उगवण्यासाठी म्हणून एक इसम ब्रिटनच्या महाराणी, क्वीन एलिझाबेथ द्वीतीय यांच्या महालात काही हत्यारांसह पोहोचला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांच्या माहितीनुसार हल्लेखोर जसवंत सिंह चैल हा अवघ्या 19 वर्षांचा आहे. 


1919 मध्ये भारतातील अमृतसर येथे झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाचा सूर उगवण्यासाठीच तो थेट राणीची हत्या करण्याच्या उद्देशानं तेथे पोहोचला. 


मानसिक स्वास्थ्य कायद्याअंतर्गत तेथील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. 


'द सन'च्या वृत्तानुसार सध्या ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाच्या मानसिक आरोग्याची चाचणी घेण्यात येत आहे. इतकंच नव्हे, तर त्याला डॉक्टरांच्या निरीक्षणाअंतर्गतही ठेवण्यात आलं आहे. 


सदर घटनेचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. जिथे जसवंत सिंग धनुष्यबाण घेऊन त्याचा मनसुबा पूर्ण करण्याच्या उद्देशानं येताना दिसत आहे. 


खुद्द जसवंतनं स्नॅपचॅटवर ख्रिसमसच्या दिवशी स्नॅपचॅटवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ज्यानंतर त्याला विंडसर कॅसल येथून ताब्यात घेतलं गेलं. 


जसवंतनं आपला आवाज लपवण्यासाठी एक फिल्टर वापरला होता. त्यानं हुडी आणि मास्क घातला होता. स्टार वॉर्स या चित्रपटापासून त्याचे कपडे प्रेरित असल्याचं दिसत होतं. 


'मी जे काही केलं त्यासाठी क्षमा करा, मी जे काही करेन त्यासाठी मला क्षमा करा. मी राणी एलिझाबेथची हत्या करण्याचा प्रयत्न करेन. हा 1919 मधील जालियनवाला बाग हत्याकांडाचा सूड आहे', असं तो व्हिडीओमध्ये म्हणाला होता. 


महालामध्ये तो आलाच कसा? 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्लेखोराला सीसीटीव्हीच्या माध्यमातून हेरण्यात आलं होतं. 


महालाच्या बागेमध्ये तो फिरताना दिसरला होता. बाहेरची संरक्षक भींत ओलांडून तो आत आला होता.