मुंबई : जगातील कोरोना विरूद्ध सुरु असलेल्या लढाईत भारताचे महत्त्व अचानक वाढले आहे. अनेक विश्लेषकांचा असा विश्वास आहे की, भारताचे हे महत्त्व संकटाच्या वेळी आपली उदारमतवादी प्रतिमा अधिक प्रभावी करू शकते. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या मलेरिया औषधाची निर्मिती भारतात केली जाते. सुपर पॉवर अमेरिका आणि तंत्रज्ञानात सर्वात पुढे असलेल्या इस्राईलने देखील भारताकडे मदत मागितली. भारतानेही सर्वांना हे औषध दिले आणि सर्वांनी त्याचे खुलेपणाने कौतुक केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काल जे काश्मीरच्या बाबतीत पाकिस्तानबरोबर होते ते आज हे औषध भारताकडून मागत आहेत. कदाचित मलेशिया आणि तुर्की यापुढे काश्मीरवर पाकिस्तानची बाजू घेऊ शकणार नाहीत.


भारताने आतापर्यंत हे औषध 13 देशांना पुरवले आहे आणि अजूनही जगातील अनेक देश त्यासाठी रांगेत आहेत. अमेरिका-युकेपासून युगांडा पर्यंतच्या एकूण 55 देशांना भारत हायड्रॉक्सीक्लोरोक्विन पुरवणार आहे.


हायड्रोक्सीक्लोरोक्वीन एक मलेरिया विरोधी औषध आहे, जो संधिवात आणि ल्युपसच्या उपचारात देखील वापरला जातो. भारत हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे आणि दर वर्षी 50 दशलक्ष किंमतीची निर्यात केली जाते. जगातील हायड्रोक्सीक्लोरोक्वाइन उत्पादनापैकी एकट्या भारताचा वाटा 70 टक्के आहे. भारताला जगातील फार्मसी म्हणतात. काही आफ्रिकी देश आणि लॅटिन अमेरिकन देशांकडून मानवतावादी म्हणून औषध निर्यात करण्याच्या निर्णयाबद्दलही भारताचे कौतुक होत आहे. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैयर बोल्सनारो आणि इस्त्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही हायड्रॉक्सीक्लोरोक्विन पाठविल्याबद्दल भारताचे आभार मानले. यूकेसह इतर अनेक देशांनीही भारताचे आभार मानले आहेत.


कोरोना विषाणूच्या लढाईत हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचे ​​गेम चेंजर म्हणून वर्णन करणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही भारताचे कौतुक केले. ट्रम्प म्हणाले, विलक्षण काळात मित्रांच्या पाठिंब्याची गरज वाढते. हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या निर्णयाबद्दल भारत आणि भारतीयांचे आभार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कोरोनाविरूद्धच्या लढाईत भारताचा संपूर्ण मानवतेला फायदा होत आहे.


ट्रम्प यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दोन्ही देशांमधील मजबूत संबंधांवर जोर दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लिहिले, मी तुमच्याशी पूर्णपणे सहमत आहे. कठीण वेळा मित्रांना जवळ आणतात. भारत-अमेरिका भागीदारी पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाली आहे. कोरोना विषाणूंविरूद्ध लढण्यात भारत मानवतेच्या प्रत्येक मार्गाने मदत करेल. आम्ही हा लढा एकत्र जिंकू.


कोरोनाच्या संकटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील अनेक देशांशी संपर्क साधला आणि या लढ्यात त्यांच्या पाठिशी असल्याचं सांगितलं. मार्चमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण आशियाई सहकार संघटना (सार्क) देशांसाठी कोरोना व्हायरस फंडाची घोषणा केली आणि दहा लाख डॉलर्स देण्याचं जाहीर केलं. भारत नेपाळ, भूटान, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, मालदीव, मॉरिशस आणि सेशल्स यांना हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधे पाठवणार आहे.


काश्मिरबाबत पाकिस्तानला उघडपणे समर्थन करणारे तुर्की आणि मलेशिया यांनीही भारताला हे औषध पाठविण्याची विनंती केली आहे. दोन्ही देशांशी भारताचे मुत्सद्दी संबंध काही काळासाठी तणावपूर्ण बनले होते. मलेशियातील एका मंत्र्याने रॉयटर्स एजन्सीला सांगितले की, भारताने औषधाची एक खेप पाठवली आहे आणि सरकारने दुसरी खेप पाठविण्याचे आवाहन केले आहे.


भारताच्या या प्रयत्नांमुळे जगातील भारताची स्थितीही बळकट होत चालली आहे. भारताचे माजी परराष्ट्र सचिव कंवल सिब्बल यांनी अलजजीरा या वाहिनीला सांगितले की, काही प्रमाणात भारताने अनेक देशांकडून सद्भावना कमावली आहे. लोकांना माहित आहे की चीन जास्त प्रमाणात पीपीई (पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट) आणि वेंटिलेटर तयार करते, परंतु भारत त्यापेक्षा वेगळा आहे, भारत पैसा कमावण्यासाठी नव्हे तर आंतरराष्ट्रीय एकता येण्यासाठी काम करत आहे.


अमेरिकेत भारताचे राजदूत असलेले ललित मान सिंह म्हणाले की, 'आपण यावेळी कुटनीतीविषयी चर्चा नाही केली पाहिजे. जेव्हा एखादा देश संकटात असताना औषध पाठविण्याचे आवाहन करते, तेव्हा तो देश त्या देशाचा फायदा घेण्याचा विचार नाही करत. सध्या मानवता सगळ्यात वर 
ठेवली पाहिजे. भारत नेहमी गरजूंना मदत करता आला आहे. खासकरुन फार्मा सेक्टरमध्ये. भारतने एचआईव्ही सोबत लढण्यासाठी आफ्रिकेमध्ये औषधं पाठवून लाखो लोकांचा जीव वाचवला आहे.'


भारत जेनेरिक औषधांचा सर्वात मोठं उत्पादन करतं. मागील काही वर्षांमध्ये भारतात खूपच कमी पैशांमध्ये औषधं बनवली जात आहेत. ज्यामुळे जगभरातील लोकांवर स्वस्तात उपचार होत आहेत. पण भारत औषधांच्या कच्चा मालासाठी चीनवर अवलंबून आहे. हुबई प्रांतातून जेनरिक औषधांसाठी लागणारा कच्चा माल येतो. हेच कोरोनाचं केंद्र आहे. चीनमधून सध्या आयातीवर बंदी असल्याने तेथून कच्चा माल येत नाहीये. त्यामुळे येणाऱ्या काळात औषधांची कमतरता निर्माण होऊ शकते.