नवी दिल्ली : काश्मीरच्या मुद्यावर फ्रान्सने भारताचे उघड समर्थन केले आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार म्हणतात की, काश्मीर प्रकरणावर फ्रान्सने भारताचे समर्थन केले आहे आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) चीनला कोणताही 'प्रक्रियात्मक खेळ' खेळण्यास परवानगी दिली जाणार नाही. यापूर्वी चीन आणि काश्मीरच्या मुद्यावर अमेरिकेनेही भारताला पाठिंबा दर्शविला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्रान्स आणि भारत यांच्यात संबंध आणखी घट्ट करण्यासाठी दोन्ही देश प्रयत्न करत आहेत. भारत दौर्‍यावर आलेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे सल्लागार इमॅन्युएल बॉन म्हणाले की, “जेव्हा चीन नियम मोडतो तेव्हा आपल्याला खूप मजबूत व अगदी स्पष्ट असले पाहिजे. हे हिंद महासागरात आपल्या नौदलाच्या अस्तित्वाचे कारण आहे.


विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशन (व्हीआयएफ) आयोजित 'फ्रान्स आणि इंडिया: स्थिर आणि समृद्ध इंडो-पॅसिफिकमधील भागीदार' या विषयावरील भाषणात ते म्हणाले की फ्रान्स क्वाड (अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत यांचा एक समूह आहे) आणि भविष्यात या देशाचे नौदल एकत्र सराव देखील करू शकतात.


तैवानमध्ये पेट्रोलिंग करणारी फ्रान्स नौदल ही एकमेव युरोपियन नौदल असल्याचे नमूद करीत ते म्हणाले की, हे चिथावणी देणे नव्हे तर आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करण्याची गरज यावर भर देण्यासारखे आहे. आम्हाचा संघर्ष वाढवायचा नाही. मला वाटते की दिल्लीपेक्षा पॅरिस येथून ते सांगणे सोपे आहे, आणि तेव्हा जेव्हा तुम्हाला हिमालयीन प्रदेशात समस्या असेल आणि तुमची सीमा पाकिस्तानला लागून असेल.”


ते म्हणाले, 'भारताच्या धोक्याबद्दल आम्ही नेहमीच स्पष्ट आहोत. मग ते काश्मीर असो, आम्ही सुरक्षा परिषदेमध्ये भारताचे प्रबळ समर्थक आहोत, आम्ही चीनला कोणत्याही प्रकारचा प्रक्रियात्मक खेळ खेळू दिला नाही. जेव्हा हिमालयीन प्रदेशांचा विचार केला जातो, तेव्हा आपण आमची विधाने तपासली पाहिजेत, आम्ही पूर्णपणे स्पष्ट आहोत. आपण जाहीरपणे जे बोलतो त्यात अस्पष्टता नाही.'


राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशी झालेल्या चर्चेबद्दल बोलताना बोन म्हणाले की, राजकीय संधी तसेच द्विपक्षीय संरक्षण आणि सुरक्षा संबंधांवर चर्चा झाली. 'ते म्हणाले की, 'लष्करी सहकार्य आणि हिंद महासागराच्या मुद्दय़ावरही चर्चा झाली.'