मुंबई : जिद्द असेल तर काहीही शक्य आहे.... पण ही गोष्ट फक्त मनुष्यालाच नाही तर प्राणीमात्रांना देखील शक्य आहे. हे खरं ठरवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मादा अस्वल आणि लहानशा पिल्लासोबत बर्फाचा डोंगर चढताना दिसत आहे. असं सांगितलं जातंय की हा रूसी अस्वल आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडिओत सर्वात पुढे एक मादा अस्वल चढताना दिसत आहे. पण यातील महत्वाची गोष्ट म्हणजे त्या अस्वलाच्या पिल्लाचा चढण्यासाठी असलेला प्रयत्न. या बर्फाच्या डोंगरावर तो चढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र यामध्ये तो अनेक असफल होतो पण त्याची जिद्द वाखाण्याजोगी आहे. 



हे लहान अस्वल आपल्या आईच्या मागे या डोंगरावर चढत आहे. पण लहान ते जीव त्याला चढताना असंख्य संकटाना सामोरं जावं लागत आहे. असं असताना आई डोंगराच्या कड्यावरून त्याला हाक मारते आणि ते लहान अस्वल पुन्हा एकदा चढण्याचा प्रयत्न करतो.