Fact About Donuts: बेकरीचे प्रोडक्ट्स हे खाण्यासाठी तर उत्तम असतातच पण ते दिसायला देखील खुप आकर्षक असतात. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे डोनट्स (Donuts). लहान मुलांपासून ते वयवृद्धांपर्यंत सर्वांनाच डोनट्स खायला आवडतात. याच डोनट्सबद्दल तुम्हाला एक इन्ट्रेस्टिंग बाब माहितीये का? डोनट्सच्यामध्यभागी गोल होल का असतं? डोनट्समध्ये असणारं होल, डोनट्स आकर्षक दिसण्यासाठी केलेलं असतं असा जर तुमचा समज असेल तर तुम्ही चुकीचा विचार करताय. डोनट्समध्ये असणारं हे होल सुरुवातीपासून नव्हतं, नंतरच्या काळात डोनट्समध्ये होल करण्याची पद्धत सुरु झाली. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, डोनट्समध्ये होल करण्याची पद्धत केव्हापासून सुरु झाली...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोनट्सला फ्राय करुन बनवलं जातं. सुरुवातीच्या काळात जेव्हा यामध्ये होल करण्याची पद्धत नव्हती तेव्हा डोनट्सला तेलात फ्राय केल्यानंतर तो पुर्णपणे फ्राय होत नव्हता. त्याच्या बाहेरचा भाग कच्चा राहत होता. या समस्येला तोडगा म्हणून डोनट्समध्ये होल करण्याची पद्धत सुरु केली. यामुळे डोनट्स व्यवस्थितपणे दोन्ही बाजूने (आतून- बाहेरुन) फ्राय होतं. याच कारणामुळे डोनट्समध्ये होल असतं.


डोनट्समध्ये Hole करण्याची पद्धत केव्हापासून सुरु झाली?


सुरुवातीच्या काळात डोनट्सला फ्राईड केक (Fried Cake) असं म्हटलं जात होतं. एका शिप कॅप्टन हॅनसेन ग्रेगरीने सल्ला दिल्यानंतर 1847 साली डोनट्समध्ये होल करण्याची पद्धत सुरु झाली. फ्राईड केक पूर्णपणे फ्राय होत नव्हता याचा परिणाम त्याच्या चवीवर होत होता. यामुळे फ्राईड केकमध्ये होल करण्याची पद्धत सुरु झाली आणि त्याचं नावं डोनट्स (Donuts) असं झालं.