Trending News : सोशल मीडियावर (Social Media) सध्या व्हायरल होणाऱ्या एका फोटोची जोरदार चर्चा होत असून या घटनेने सर्व हैरान झाले आहेत. हवेत उडणाऱ्या विमानातील एक व्यक्ती गोळी लागून गंभीर जखमी झाला. धक्कादायक म्हणजे जमिनीवरुन गोळी चालवण्यात आली होती. या गोळीने साडेतीन हजार फूट उंचीवरुन उडणाऱ्या विमानाला भेदलं. गोळी प्रवाशाच्या कानाला लागली, यात तो गंभीर जखमी झाला. या घटनेने विमान ताबडतोब उतरवण्यात आलं आणि प्रवाशाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. म्यानमारमध्ये ही घटना घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार म्यानमारमधल्या (Myanmar) लोइकावमध्ये म्यानमार नॅशनल एअरलाइंचं (Myanmar Airlines) विमान 63 प्रवाशांना घेऊन लोइकाव विमानतळाच्या दिशेने जात होतं. त्याचेवळी जमिनीवरुन हवेत गोळीबार करण्यात आला. गोळीबार करण्यात आला तेव्हा विमान लोइकाव विमानतळापासून 3.7 मील दूर होतं आणि जवळपास 3500 फूट उंचीवर होतं. धक्कादायक म्हणजे इतक्या उंचीवर असूनही गोळी विमानाला भेदून आत शिरली. विमानात बसलेल्या एका प्रवाशाच्या कानाला गोळी चाटून गेली. यात तो प्रवासी जखमी झाला. 


प्रवाशाला लोइकाव पिपल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हल्ला कोणी आणि का केला याचा तपास म्यानमार सैन्यच्यावतीने केला जात आहे. सोशल मीडियावर या दुर्घटनेशी संबंधीत काही फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. 


घटनेनंतर सर्व विमानांची उड्डाणं अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आल्या आहेत. म्यानमार सैन्याने या गोळीबारासाठी मिलिशिया आणि करेनी नॅशनल प्रोग्रेसिव्ह पार्टी या बंडखोरांना जबाबदार ठरवलं आहे. प्रवासी विमानावर हल्ला करणं हे युद्धजन्य अपराध असल्याचं म्यानमार सैन्याने म्हटलं आहे.


दुसरीकडे बंडखोरांनी मात्र या हल्ल्याचा इन्कार केला आहे.  आम्ही राष्ट्रीय समानता आणि न्याय या तत्त्वांचं समर्थन करून 70 वर्षांहून अधिक काळ लढत आहोत. आम्ही कोणत्याही दहशतवादी कृत्यात सहभागी होऊ शकत नाही. हे आमच्या तत्त्वांच्या विरुद्ध आहे. जर आम्हाला हल्ला करायचा असेल तर आम्ही विमानतळाच्या  जवळ असलेल्या लष्करी तळांवर गोळीबार करु असं बंडखोरांनी म्हटलं आहे.