अमेरिका: महाग मिळणारे स्मार्टफोनदेखील सुरक्षित नाहीत, असे दिसून येत आहे. अमेरिकी स्मार्टफोन निर्माता कंपनी आयफोनने बाजारात मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. आयफोनकडून तयार केलेला आयफोन एक्स मॅक्स स्मार्टफोनला आग लागल्याची तक्रार १२ डिसेंबरला नोंदवण्यात आली आहे . ही घटना तीन आठवड्यांपूर्वी अमेरिकेतील ओहयो शहरात घडली. एका व्यक्तीने त्याच्या खिशात ठेवलेल्या आयफोन एक्स मॅक्सने पेट घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्मार्टफोनला आग लागल्याने स्मार्टफोन बदलून द्यावा, अशा मागणी आयफोन कंपनीने फेटाळून लावली. त्यामुळे संबंधित व्यक्तीने कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.
 
भारतात सुरुवातीला आयफोन एक्स मॅक्सची किंमत १ लाख ९ हजार ९०० रुपये होती. मिळालेल्या माहितीनुसार, आयफोनमध्ये ही पहिल्यांदाच घडलेली घटना आहे. आयड्रॅाप न्युजच्या अहवालानुसार, जे. हिलार्ड जेवायला गेले असताना स्मार्टफोन त्यांच्या पॅन्टच्या खिशात ठेवला होता. जेवताना हिलार्डला यांना विचित्र वास येऊ लागला. थोड्या वेळाने त्यांना स्मार्टफोन गरम होत असल्याचा भास झाला. त्यांनतर हिलार्डला चटका बसू लागला.  हिलार्ड याने सांगितले की, आयफोन एक्स मॅक्समधून हिरवा आणि पिवळा रंगाचा धूर येऊ लागला. माहितीनुसार स्मार्टफोनची आग विझवण्यासाठी आग नियंत्रण यंत्राचा वापर करण्यात आला होता. हिलार्ड याच्यासोबत घडलेली ही घटना तेथील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. 
 
घटनेनंतर हिलार्डने अॅपलच्या स्टोअरमध्ये जाऊन तक्रार नोंदवली. स्टोअरमध्ये गेल्यानंतर हिलार्डला सांगण्यात आले की, आयफोन कंपनीकडून इंजिनिअरींग टीमला चौकशीसाठी पाठवण्यात येणार, त्यानंतरच कंपनीकडून दुसरा फोन देण्यात येईल. सध्या, या घटनेबद्दल ऍपलने कोणतीही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.