नवी दिल्ली : एक जिममध्ये झुम्बा डांसची प्रॅक्टिस करतांना ४ तरुण आणि २ तरुणींना पोलिसांनी अटक केली आहे. इराणच्या रिवोल्यूशनरी गार्डने ही कारवाई केली आहे. इराणमधील सेमनानमधली ही घटना आहे.


इराण हा इस्लामिक देश आहे त्यामुळे इस्लामिक कायद्यानुसार तेथे झुम्बा डान्सवरप बंदी आहे. अटक करण्यात आलेल्या तरुण-तरुणींवर इराणची इस्लामिक संस्कृती भ्रष्ट करण्याचा आणि बुरखा न घालण्याच्या प्रवृत्तीला बळ देण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.