मुंबई : चीनपासून सुरुवात झालेल्या कोरोनानं जगभर थैमान घातल आहे. जगातील ९० हून अधिक देशात सुमारे १ लाख ९ हजार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ३ हजार आठशे दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार चीन आणि त्यानंतर इटलीमध्ये कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झालय. त्याखालोखाला इराण आणि दक्षिक कोरीयातही अनेकांचा मृत्यू झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनमध्ये आणखी २७ जणांचा कोरोना व्हायरसने मृत्यू झाल्याची माहिती एएफपीने दिली आहे. त्यामुळे आता कोरोनाच्या चीनमधल्या बळींची संख्या ३,०९७ झाली आहे जगभरात कोरोना व्हायरस झपाट्यानं पसरत आहे. इटलीतही कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असून इटलीत आतापर्यंत  366 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. चीन नंतर इटलीत सर्वाधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान इटलीत सुमारे ६ हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.


कोरोना व्हायरसमुळे इराणमध्ये एका दिवसात ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे इराणमध्ये कोरोनाने मृत्यू पावलेल्यांचा आकडा आता १९४ इतका झाला आहे. विशेष म्हणजे २४ तासांत इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनामुळे मृत्यू पावण्याची इराणमधली ही पहिलीच घटना आहे. कोरोनाचा उगम झालेल्या चीननंतर सर्वाधिक मृतांची संख्या सध्या इराणमध्ये आहे. इराणमधल्या सर्व ३१ प्रांतांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे. तर ६ हजार ५६६ जणांना लागण झाली आहे.