बार्सिलोना हल्ल्याची या दहशतवादी संघटनेने घेतली जबाबदारी
स्पेनमधील बार्सिलोना येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. बार्सिलोनामधील सिटी सेंटरमध्ये एका कारने काही नागरिकांना चिरडलं.
बार्सिलोना : स्पेनमधील बार्सिलोना येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. बार्सिलोनामधील सिटी सेंटरमध्ये एका कारने काही नागरिकांना चिरडलं.
या दुर्घटनेत १३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झाले आहेत. या हल्ल्याची जबाबदारी आयसीस या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. या हल्ल्यात ४ संशयित दहशतवादी ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेनंतर त्या परिसरातील मेट्रो स्टेशन बंद करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बार्सिलोनातील लॉस रामब्लास परिसरात एका वाहनाने नागरिकांना चिरडलं. या घटनेनंतर परिसरातील मेट्रो आणि रेल्वे स्टेशन बंद करण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे. या घटनेनंतर वाहनचालकाने घटनास्थळावरुन पळ काढल्याची माहिती समोर येत आहे.
या हल्ल्यानंतर बार्सिलोनात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी ४ संशयितांना अटक केली आहे. ड्रिस ओउकाबीर असं त्यापैकी एकाचं नाव आहे. यापूर्वी फ्रान्स, बेल्जियम आणि जर्मनीत अशा पद्धतीचे हल्ले झाले होते. त्यात आता स्पेनचीही भर पडली आहे.