नवी दिल्ली : आयसीसचा म्होरक्या अबू बक्र अल बगदादीवर सीरियात अमेरिकेने हल्ले चढवल्याची माहिती आहे. याबाबतचं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे. या हल्ल्यात अबू बक्र अल बगदादी मारला गेल्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या स्पेशल फोर्सेसनी उत्तर सीरियात हल्ला चढवल्याची माहिती तीन बड्या अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीरियाच्या उत्तरेकडील इडलीब इथे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. या संदर्भात थोड्याच वेळात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प स्वतः घोषणा करतील अशी शक्यता आहे. आज सकाळी ट्रम्प यांनी Something very big has just happened असं ट्विट करून उत्सुकता वाढवली आहे.