रामल्ला : पॅलेस्टीनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांच्याशी फोनवर चर्चा केली. इस्राईल द्वारा होणारे हल्ले बंद करण्याचे आवाहन त्यांनी बायडेन यांना केले आहे.


पॅलेस्टीनला शांतता हवीये


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पॅलेस्टीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने शनिवारी माहिती दिली की, 'अब्बासने अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या परिसरातून इस्राईली सैन्य हटत नाही तोपर्यंत या क्षेत्रात सुरक्षा आणि शांतता प्रस्तापित होऊ शकत नाही. पॅलेस्टीनच्या नागरिकांना शांतता हवीये'.


बेंजामिन यांचीही चर्चा


इस्त्राईलचे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन नेतन्याहू यांनी देखील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याशी चर्चा केली. त्यांनी हमासचे हल्ले आणि त्याला इस्त्राईलचे प्रत्युत्तर याबाबत बायडेन यांना माहिती दिली. 


नेतन्याहू म्हटले की, 'आत्मरक्षेच्या अधिकाराचा अमेरिकेद्वारा मिळालेल्या बिनशर्त पाठिंब्याचे आम्ही आभार मानतो. जे लोक हिंसेत सहभागी नाहीत. त्यांचे नुकसान होणार नाही. याबाबत इस्त्राईल पूर्ण प्रयत्नशील आहे'.


शनिवारी गाझा सिटीमध्ये एक बहुमजली इमारत इस्त्राईलच्या हवाई हल्ल्यात नष्ट झाली. या इमारतीत 'द असोशिएटेड प्रेस', 'अल जझिरा'सह अन्य मीडिया संस्थाने आणि कार्यालये होती.