जेरूसेलम : इस्रायलचे अरब आणि मुस्लिम देशांशी गुप्त करार असल्याचं वक्तव्य इस्रायली मंत्र्यांनी केलं आहे.


इस्रायली मंत्र्यांचा धक्कादायक खुलासा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इस्रायलचे अनेक अरब आणि मुस्लिम देशांशी गुप्त करार असल्याचं वक्तव्य इस्रायली उर्जामंत्री युवल स्टिनीत्झ यांनी केलं आहे. इस्रायलच्या लष्करी रेडिओवर बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. मात्र त्या देशांच्या विनंतीमुळेच त्यांची नावं गुप्त ठेवण्यात आली आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलयं.


बेंजामीन नेतान्याहू काय म्हणाले


मुस्लिम मूलतत्ववादाच्या विरोधात आम्ही अरब राष्ट्रांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहोत, असं गेल्याच आठवड्यात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी इस्रायली संसदेत सांगितलं होतं. या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर इस्रायल अरब संबंधाकडे बघितलं जातयं.


हसन नसरल्लाहचा आरोप


हिज्बुल्ला या संघटनेचा नेता हसन नसरल्लाह याने आरोप केला आहे की, सौदी अरेबियानेच इस्रायलला लेबनॉनवर हल्ला करायला सांगितलं आहे.


इस्रायल आणि सौदी अरेबिया युती


इराणचा हिज्बुल्ला या संघटनेला पाठिंबा आहे.
इराणचा आखातातील वाढता प्रभाव रोखण्यासाठीच इस्रायल आणि सौदी अरेबिया गुप्तपणे एकत्र आले आहेत.