हमासच्या रॉकेट हल्ल्याला इस्रायलच्या विमानांनी दिलं प्रत्यत्तर!
इस्रायलने हमासच्या दहशदवादी अड्ड्यांवर केला हल्ला.
गाझा सिटी : इस्रायलने हमासच्या दहशदवादी अड्ड्यांवर केला हल्ला.
ट्रम्प निर्माण केलं वादळ
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अलिकडेच जेरुसलेमला इस्रायलची राजधानीचं स्थान देण्याची घोषणा केल्यानंतर आखातातलं वातावरण पेटलं होत. त्यानंतर गाझातल्या पॅलेस्टीनी दहशदवाद्यांनी इस्रायलच्या दक्षिण भागात १८ रॉकेटचा मारा केला.
हवाई हल्ला
यातली काही रॉकेट इस्रायलने पाडली, परंतु बाकीची इस्रायलच्या दक्षिण भागात पडली. यानंतर इस्रायलने हवाई हल्ला करून हमासला प्रत्यत्तर दिलं. हमासच्या तळांना लक्ष केलं होतं.
ईराणवर लक्ष
यासर्व घडामोडींमध्ये इस्रायलचा मुख्य हेतू आंतरराष्ट्रीय लक्ष ईराणकडे वळवण्याचं आहे. गाझावरून लक्ष हटून जगाचं लक्ष ईराणवर केंद्रीत करण्यावर इस्रायलचा प्रयत्न आहे.