इजराइल-हमास युद्धातील हिंसाचार पाहून अॅम्ब्युलन्स ड्रायव्हरला अश्रू अनावर, म्हणतो...
Israel Hamas Conflict : इजराइल-हमास युद्धातील हिंसाचार पाहून अॅम्ब्युलन्स ड्राइव्हरला देखील रडू कोसळलंय. ड्रायव्हरच्या सीटवर बसल्या बसल्या त्याला आणखी लोकांना आणू शकलो नाही, याचं दु:ख त्याला पचवचा येत नव्हतं. त्याचा व्हिडीओ साध्य सोशल मीडिया वर व्हायरल होतोय.
Ambulance driver Viral Video : सध्या गाझापट्टीत मोठा राडा सुरू असल्याचं पहायला मिळतंय. दहशतवादी संघटना हमासनं (Hamas) युद्धाचे सारे नियम मोडले आहेत. इस्रायलवर हल्ला (Israel Attack) करताना नागरिकांनाही सोडलं नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जिवितहानी झाल्याचं चित्र समोर आलं आहे. अशातच आता दोन्ही बाजूंनी बॉम्बचा वर्षाव सुरू असल्याने रुग्णालयात भरती होणाऱ्यांची संख्या देखील कित्येक पटीने वाढली आहे. अशातच आता अॅम्ब्युलन्स ड्रायव्हरचा (Ambulance driver ) एक व्हिडीओ (Viral Video) सध्या समोर आला आहे.
पॅलेस्टीन आणि इस्त्रायलमध्ये (Israel vs Palestine) सुरु असलेलं युद्ध अधिक विध्वंसक होतंय. फॉस्फरस बॉम्ब सारख्या रासायनिक बॉम्बचा देखील युद्धात केला जात आहे. त्यामुळे लोकांवर मानसिक परिणाम देखील होत असल्याचं दिसतंय. अशातच आता इस्त्रायलमध्ये आरोग्यसेवा सुरळीत करण्यात आली आहे. लोकांपर्यंत अॅम्ब्युलन्स पोहोचवल्या जात आहेत. अशातच आता अॅम्ब्युलन्स ड्राइव्हरचा एक व्हिडीओ समोर आलाय. ज्यामध्ये तो ओक्साबोक्शी रडताना दिसतोय.
प्रत्येक जखमीला रुग्णालयापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही, प्रत्येकाचा जीव आपण वाचवू शकत नाही, असं म्हणत त्याला अश्रू अनावर झाले. आपल्या परिवाराचा विचार न करता अॅम्ब्युलन्स ड्राइव्हर लोकांची मदत करताना दिसत आहे. मात्र, युद्धातील हिंसाचार पाहून अॅम्ब्युलन्स ड्राइव्हरला देखील रडू कोसळलंय. ड्रायव्हरच्या सीटवर बसल्या बसल्या त्याला आणखी लोकांना आणू शकलो नाही, याचं दु:ख त्याला पचवचा येत नव्हतं. त्याचा व्हि़डीओ सध्या मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.
पाहा Video
दरम्यान, इस्रायलने हमासविरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात आक्रमक पावित्रा घेतला आहे. गाझा पट्टीला वेढा घातल्याने तिसऱ्या दिवशीही वीज, इंधन आणि खाद्यपदार्थांचा पुरवठा बंद आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेविरुद्धच्या निर्णायक युद्धात इस्रायलने तीन लाख राखीव सैनिकही उतरवले. यानंतर इस्रायलनेही हमासला चोख प्रत्युत्तर दिले असून त्यात आतापर्यंत सुमारे 1300 लोकांचा मृत्यू झाला आहे.