इस्राईलचं गाझाला प्रत्यूत्तर, हवाई हल्ल्यात २०० ठिकाणं उद्धवस्त
अमेरिकेकडून इस्राईलचं समर्थन
गाझा : गाझाने रविवार रॉकेट हल्ला केल्यानंतर इस्राईलने प्रत्यूत्तर देत त्यांच्यावर हवाई हल्ले केले. त्यामुळे दोघांमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. गाझाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं की, शनिवारी इस्राईलने केलेल्या हल्ल्यात ६ कट्टरतावादी आणि १३ फिलिस्तीनी नागरिक मारले गेले. तर इस्राईलने एक मुलगा आणि त्याची गर्भवती आईचा मृत्यू झाल्याची बातमी खोटी असल्याचं म्हटलं आहे.
गाझावरच्या हल्ल्यात ३ नागरिकांचा मृत्यू
इस्राईलच्या लष्कराने म्हटलं की, रविवारी दक्षिण इस्राईलमध्ये गाझाने केलेल्या हल्ल्यात ३ नागरिकांचा मृत्यू झाला. इस्राईलने केलेल्या हल्ल्यात गाझामधील काही इमारती नष्ट झाल्या. इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं की, 'लष्कराला गाझामधील दहशतवादी आणि कट्टरतावाद्यांच्या ठिकाणांवर हल्ले करण्यासाठी सूट देण्यात आली आहे.'
इस्राईलकडून २०० ठिकाणं उद्धवस्त
इस्राईलने गाझाजवळ आधीच तैनात सैनिकांच्या मदतीसाठी टँक, तोफ आणि आणखी काही सैनिकांना पाठवण्याचे आदेश दिले आहेत. गाझावर सध्या शासन करणाऱ्या हमासने सध्या संघर्ष सुरु केला आहे. इस्राईलकडून काही आणखी सूट मिळावी यासाठी हा संघर्ष सुरु आहे. इस्राईलने म्हटलं की, फिलीस्तीनी सीमा भागात शनिवारपासून आतापर्यंत ४३० मिसाईल सोडण्यात आले. ज्यामुळे लष्कराचे काही रस्ते उद्धवस्त झाले आहेत. सोबतच २०० दहशतवाद्यांच्या ठिकाणांना लक्ष्य केलं गेलं.
अमेरिकेकडून इस्राईलचं समर्थन
इस्राईलच्या या कारवाईची तुर्कच्या राष्ट्राध्यक्षांनी निंदा केली आहे तर अमेरिकेने इस्राईलचं समर्थन केलं आहे. हमासचा सहयोगी इस्लामिक जिहादीने हा रॉकेट हल्ला केल्याची जबाबदारी घेतली. आणखी काही रॉकेट हल्ल्यासाठी तयार असल्याचं देखील म्हटलं. त्यानंतर इस्राईलने केलेल्या हल्ल्याचं अमेरिकेने समर्थन केलं. इस्राईल आत्मरक्षणाचा अधिकार असल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्राचे अधिकारी शांती प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत आहे.