Chandrayaan 3 ने शनिवारी चंद्राच्या कक्षेत प्रवेश करत महत्त्वाचा टप्पा पार केला आणि पुन्हा एकदा भारतीयांचा ऊर अभिमानाने भरुन आला. दरम्यान चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यावरील कॅमेरा कार्यान्वित करण्यात आला. रविवारी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने (ISRO) चंद्राचे पहिले फोटो जारी केले आहेत. या फोटोत चंद्राच्या पृष्ठभागावर खूप सारे खड्डे दिसत आहेत. आता हे फोटो पाहिल्यानंतर हे खड्डे कधी आणि कसे तयार झाले? त्यावर चांद्रयान-3 लँडर सहजपणे लँडिग करु शकेल का? असे अनेक प्रश्न तुम्हालाही पडले असतील. तर त्यांची उत्तरं जाणून घेऊयात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पृथ्वी आणि चंद्राची गोष्ट तशी एकत्रच सुरु होते.  ही गोष्ट 450 वर्षं जुनी आहे. तेव्हापासून आतापर्यंत या दोन्हींवर अंतराळातून येणारे दगड, उल्का कोसळत असतात. हे कोसळल्यानेच हे खड्डे (Crater) तयार होतात. यांना इम्पॅक्ट क्रेटर (Impact Crater) असंही म्हणतात. पृथ्वीवर आतापर्यंत असे 180 इम्पॅक्ट क्रॅटर सापडले आहेत.


चंद्रावर 14 लाख खड्डे आहेत. यामधील 9137 हून अधिक क्रेटरची ओळख पटली आहे. यामधील 1675 क्रेटरचं तर वयही समजलं आहे. पण तिथे असे अनेक खड्डे आहेत, जे अद्याप माणसाला दिसलेले नाहीत. कारण अंधारात असणारे हे खड्डे पाहणं सोपं नाही. चंद्राच्या पृष्ठभागावर असणारे हे खड्डे फक्त इम्पॅक्ट क्रेटर आहेत असं नाही. काही खड्डे करोडो वर्षांपूर्वी ज्वालामुखीचा स्फोट झाल्यानेही तयार झाले आहेत. 



40 किलोच्या दगडाने तयार केला 290 किमीचा मोठा खड्डा


नासाने चंद्रावरील सर्वात मोठा खड्डा 17 मार्च 2013 ला पाहिला होता. जेव्हा 40 किलो वजनाचा एक दगड चंद्राच्या पृष्ठभागावर 90 हजार किमी ताशी वेगाने धडकला होता. या धडकेनंतर जो खड्डा तयार झाला होता तो खूप मोटा आहे. हा खड्डा तुम्ही जमिनीवरुनही पाहू शकता. जर तुम्ही टेलिस्कोपच्या सहाय्याने पाहिलं तर तुम्हाला हे अद्भूत चित्र पाहण्यास मिळेल. 


म्हणून चंद्रावर हजारो वर्षापर्यंत खड्डे तसेच राहतात


चंद्रावर ना पाणी आहे, ना पृथ्वीसारखं वातावरण आहे, तसंच ना टेक्टॉनिक प्लेट आहे. यामुळे तेथील माती दूर होत नाही. यामुळे ते खड्डे भरले जात नाहीत. याउलट पृथ्वीवर खड्ड्यांमध्ये माती भरली जाते, पाणी भरतं. या खड्ड्यांमध्ये अनेकदा रोपं, झाडंही जन्माला येतात. यामुळे हे खड्डे नष्ट होतात. 


चंद्रावरील अनेक खड्ड्यांचं वय 200 कोटी वर्षं इतकं आहे. म्हणजेच जेव्हा चंद्राची निर्मिती झाली तेव्हा त्यावर खड्डे तयार झाले नव्हते. चंद्राची निर्मिती झाल्यानंतर 250 वर्षांनी खड्डे पडण्यास सुरुवात झाली. चंद्रावरील सर्वात मोठा खड्डा दक्षिण ध्रुवाजवळ आहे. हा खड्डा पार करण्यासाठी आपल्याला याच्यात तब्बल 290 किमी चालावं लागेल. 


चंद्रावर 13 लाख खड्ड्यांचा व्यास 1 किलोमीटर आहे. 83 हजार खड्ड्यांचा व्यास 5 किलोमीटर आहे. 6972 खड्डे असे आहेत त्यांचा व्यास 20 किलोमीटरपेक्षा जास्त आहे.