इस्त्रोची गरुडझेप : एकाचवेळेस सोडणार ३१ उपग्रह
येत्या १२ जानेवारीला एकाचवेळी ३१ उपग्रह अवकाशात सोडले जाणार
बंगळूर : येत्या १२ जानेवारीला एकाचवेळी ३१ उपग्रह अवकाशात सोडले जाणार
इस्त्रोची भरारी
आपल्या नेत्रदिपक कामगिरीने इस्त्रोने सर्व जगाचे डोळे दिपवून टाकले आहेत. इस्त्रो आणखी एक जबरदस्त कामगिरी करणार आहे. येत्या १२ जानेवारीला ३१ उपग्रह एकाचवेळी अवकाशात सोडणार आहे, अशी माहिती इस्त्रोचे जनसंपर्क संचालक देवीप्रसाद कर्णिक यांनी दिली.
अमेरिकेचे २८ उपग्रह
या ३१ उपग्रहांमध्ये भारताचा कार्टोसॅट हा महत्वाचा उपग्रह असणार आहे. यात अमेरिकेचे २८ उपग्रह आणि इतर देशांचे उपग्रह असणार आहेत. इस्त्रोच्या आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील अवकाश तळावरून हे प्रक्षेपण होणार आहे. यासाठी पीएसएलव्ही सी ४० हा प्रक्षेपक वापरला जाणार आहे.
भारताचा कार्टोसॅट उपग्रह
या मोहिमेतून प्रक्षेपित केला जाणारा कार्टोसॅट हा एक मोठा उपग्रह आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील जमिनीचा वापर, रस्त्यांचं जाळं याबाबतचा अभ्यास करण्यासाठी या उपग्रहाचा वापर केला जाणार आहे.