मुंबई : इंटरनॅशनल स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थात, 'इस्रो'चा  GSAT-11 हा उपग्रह अवकाशात झेपावला आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार बुधवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास हे प्रक्षापण करण्यात आलं. दक्षिण अमेरिकेतील फ्रेंच गयानाच्या एरियानेस्पेसच्या एरियाने- ५ रॉकेटद्वारे हे प्रक्षापण पार पडलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वाधिक वजानाच्या या उपग्रहामुळे इंटरनेट सेवांमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत. ५८५४ किलोग्रॅम वजनाचा हा उपग्रह इस्रोकडून बनवण्यात आलेला आतापर्यंतचा सर्वाधिक वजनाचा उपग्रह ठरत आहे. 


'हाय थ्रोपुट' संचार असणाऱ्या GSAT-11 चा जीवनकाळ का १५ वर्षांहून अधिक आहे. यापूर्वी २५ मे रोजी त्याचं प्रक्षेपण करण्यात येणार होतं. पण, काही तांत्रिक बिघाडामुळे हे प्रक्षेपण लांबणीवर गेलं. 


प्रक्षेपणानंतर सुरुवातीला हा उपग्रह जिओ इक्वीवॅलंट ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये जाणार आहे. ज्यानंतर तो जिओ स्टॅटिक ऑर्बिटमध्ये स्थिरावेल. ठरल्याप्रमाणे हा उपग्रह त्याच्या कक्षेत स्थिरावला तर देशातील दूरसंचार विभागामध्ये आणखी प्रगती होऊन महत्त्वाचा विकास होणार असल्याचं कळत आहे. 




ही आहेत या उपग्रहाची वैशिष्ट्ये


हा आतापर्यंतचा सर्वाधिक बजनाचा उपग्रह आहे. 


या उपग्रहाची निर्मिती करण्यासाठी ५०० कोटींचा खर्च करण्यात आला असून, त्याचा जीवनकाळ १५ वर्षांहून अधिक आहे. 


चार मीटरहून अधिक मोठं असणारं या उपग्रहाचं प्रत्येक सोलार पॅनल हे ११ किलोवॅट इतकी उर्जानिर्मिती करणार आहे. 


छाया सौजन्य- इस्रो

प्रतिसेकंद १०० गीगाबाईट्सहून अधिक ब्रॉडबँड कनेक्टिव्हीटी या उपग्रहाकडून मिळणार असून, दूरसंचार विभागासाठी तो महत्त्वाची भूमिका बजावेल.