`इस्लामला युरोपमध्ये स्थान नाही, इस्लामीकरणाचे प्रयत्न..`; इटालियन PM मेलोनींचे स्फोटक विधान
Italy PM Giorgia Meloni On Islam in Europe: 3 आठवड्यांपूर्वीच दुबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर इटालियन पंतप्रधान मेलोनी यांनी क्लिक केलेला सेल्फी, त्याला दिलेली कॅप्शन चांगलीच चर्चेत होती.
Italy PM Giorgia Meloni On Islam in Europe: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी यांनी इस्लाम धर्मासंदर्भात केलेल्या विधानामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. युरोपमध्ये इस्लामिक संस्कृतीला कोणतंही स्थान नसल्याचं विधान मेलोनी यांनी केलं आहे. या विधानामुळे मेलोनी यांच्यावर टीका होताना दिसत आहे. "यूरोपचं इस्लामीकरण करण्याचा बराच प्रयत्न झाला. मात्र इस्लाममधील मूल्य युरोपीयन संस्कृतीबरोबर साधर्म्य साधणारी नाहीत. यूरोपीयन संस्कृती आणि इस्लामिक संस्कृतीमधील अनेक गोष्टी एकमेकांशी मिळत्या जुळत्या नाहीत. मूल्य आणि अधिकाऱ्यांच्या बाबतीतही फार मोठा फरक आहे. त्यामुळेच यूरोपमध्ये इस्लामिक संस्कृतीला कोणतंही स्थान नाही," असं मेलोनी म्हणल्या आहेत.
मेलोनी नेमकं काय म्हणाल्या?
3 आठवड्यांपूर्वीच दुबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर इटालियन पंतप्रधान मेलोनी यांनी क्लिक केलेला सेल्फी, त्याला दिलेली कॅप्शन चांगलीच चर्चेत होती. याच मेलोनी यांनी केलेल्या विधानावरुन नवीन वादाला तोंड फुटलं आहे. इस्लामिक संस्कृतीसंदर्भात केलेल्या विधानामुळे वादात अडकलेल्या मेलोनी यांनी, "इटलीमधील इस्लामिक सांस्कृतिक केंद्रांच्या उभारणीसाठी सौदी अरेबियामधून पैसा पुरवला जातो. सौदीमध्ये शरिया कायदा आहे," असं म्हटलं. तसेच पुढे बोलताना, "युरोपमध्ये आपल्या संस्कृतीच्या विरोधात इस्लामीकरणाचे प्रयत्न केले जात आहेत. इस्लाममधील मूल्ये आणि युरोपीयन मूल्ये एकमेकांशी समोपचाराने जुळवून घेणारी नाहीत," असं मेलोनी म्हणाल्या. मेलोनी यांचं हे विधान ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक यांनी केलेल्या विधानानंतर समोर आलं आहे. सुनक यांनी, "युरोपमधील संतुलन बिघडवण्याच्या इराद्याने काही देश मुद्दाम स्थलांतरितांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत," असं म्हटलं होतं.
ऋषी सुनक यांनी केलेलं विधान
इटलीमधील उजव्या विचारसणीच्या ब्रदर्स ऑफ इटली पक्षाच्या एका कार्यक्रमामध्ये ब्रिटीश पंतप्रधान सुनक यांनी स्थलांतरित लोकांसंदर्भात धोरणं आणि यंत्रणांमध्ये जागतिक स्तरावर बदल घडवून आणले पाहिजेत. आम्ही या सुधारणांच्या बाजूने आहोत, असं सुनक म्हणाले होते. मात्र त्याचवेळी सुनक यांनी स्थलांतरितांची युरोपीमधील वाढती संख्या ही अनेक युरोपियन देशांवर परिणाम करु शकते असा इशारा दिला आहे.
आपल्याला मदत करणं शक्य होणार नाही
याशिवाय ऋषि सुनक यांनी युरोपमधील स्थलांतरितांच्या समस्येला तोंड देण्यासाठी योग्य वेळी विचार करुन हलचाल सुरु केली नाही तर त्यांची संख्या वाढत राहील असंही सूचित केलं. स्थलांतरितांची संख्या वाढत राहिल्यास युरोपियन देशांच्या क्षमतेवर परिणा महोईळ. खरोखरच ज्यांना मदतीची गरज आहे अशा लोकांना आणि देशांना आपण या वाढत जाणाऱ्या स्थलांतरित लोकांमुळे मदत करु शकणार नाही. ऋषी सुनक यांनी युरोपीयन देशांनी आपले कायदे अपडेट करुन घेण्याची फार आवश्यकता असल्याचाही उल्लेख केला होता.