मुंबई: जंगलातील प्राण्यांचं आयुष्य हे पावला पावलावर धोक्यात असतं. त्यामुऴे प्रत्येक प्राण्याला आपला जीव मुठीत धरून राहावं लागतं. नेहमी पाण्यावर येणाऱ्याला आपलं सवज बनवून शिकार करणाऱ्या मगरीचीच शिकार झाल्याचा थरारक प्रकार घडला आहे. बिबट्या किंवा चित्ता असेल तर मगर हमखास त्याची शिकार सोडत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर जॅग्वार आणि मगरीचा 20 सेकंदाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये जॅग्वारने दबक्या पावलाने येत 20 सेकंदात मगरीचा खेळ संपवला आहे. अवघ्या 20 सेकंदात ऊन घेण्यासाठी बाहेर आलेल्या मगरीची जॅग्वारने शिकार केली. तिची शिकार करून तो तिला फरफटत घेऊन गेला. 



IFS अधिकारी सुरेंद्र मेहरा यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. नेहमी इतरांची शिकार करणाऱ्या मगरीची चित्याने शिकार केली आहे. याला त्यांनी जॅग्वार (jaguar) असं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. हा साधारण दक्षिण अमेरिकेत आढळणारा प्राणी आहे. त्याच्या तोंडातून शिकार कधी सुटत नाही. शिकारीचा हा व्हिडीओ पाहून तुम्हाला अंदाज लावताच येईल की तो किती हुशारीनं शिकार करत असेल.