श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्यानंर पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. जम्मू काश्मीरच्या सीमेवर पाकिस्तान मोठा कट आखण्याच्या तयारीत असल्याचे उघड झाले आहे. लाईन ऑफ कंट्रोलवर पाकिस्तानने तोफा तैनात केल्याची माहीती सुत्रांकडून मिळत आहे. पाकिस्तानने आपल्या एअरबेसवर लढाऊ विमान देखील तैनात केल्याचेही सांगण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानने समझौता एक्सप्रेसवरही बंदी आणली. तसेच भारतासोबत व्यापारी संबंधही तोडले. पण भारतातूनही याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. भारतीय शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी पाकिस्तानात आपले सामान निर्यात करण्यास विरोध दर्शवला आहे. तसेच भारत सरकारनेही कस्टम ड्यूटी 200 टक्क्यांनी वाढवली आहे. यामुळेच पाकिस्तानमध्ये टॉमेटोचा भाव 300 रुपये प्रतिकिलोग्राम पर्यंत पोहोचला आहे. 



पाकिस्तानने रागाच्या भरात खूप मोठे निर्णय घेतले. याचा त्रास त्यांना स्वत:लाच होतोय. पण पंतप्रधान इम्रान खान यांनीच हे निर्णय जाहीर केल्यामुळे ते तात्काळ मागे घेता येत नसल्याने नामुष्की ओढवली आहे. पहिल्यांदा पाकिस्तानने समझौता एक्सप्रेस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वाघा बॉर्डरहून जाणारी दिल्ली-लाहौर बस सेवा स्थगित केली. याशिवाय त्यांनी भारतीय दूतावासांनाही मायदेशी जायला सांगितले. या निर्णयांचा पाकिस्तानला पुढच्या काळात त्रास होऊ शकतो.