काबूल : समद अलावी या अफगाणाचा 1 जानेवारीला वाढदिवस आहे. 


वाढदिवस म्हणून 1 जानेवारी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आश्चर्य म्हणजे समद अलावीच्या बायकोचा, दोन्ही मुलांचा, त्याच्या असंख्य मित्रांचा आणि हजारो अफगाणांचा वाढदिवस 1 जानेवारीलाच आहे. कारण एका आख्ख्या पिढीनेच आपल्या सोयीसाठी आपला वाढदिवस म्हणून 1 जानेवारीची निवड केली आहे. 


कट्टरवाद्यांच्या हिंसाचाराचा परिणाम


दहशतवाद, यादवी आणि कट्टरवाद्यांच्या हिंसाचाराने एक आख्खी पिढीच बरबाद झालेल्या अफगाणिस्तानात ही कहाणी बऱ्याच लोकांची आहे. आपला जन्म नक्की कधी आणि कुठे झाला हे बऱ्याच अफगाणांना ठाउक नसतं. जन्माच्या दाखल्यांपासून सर्वच कागदपत्रांची वानवा बहुतांश अफगाणांना भेडसावते.


नोंदणीसाठी जन्मतारीख


त्यातच फेसबुकपासून पासपोर्ट, व्हिसापर्यत अनेक ठिकाणी नोंदणीसाठी जन्मतारीख लागते. अफगाण लोकांनी याच्यावर एक भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. यावर एक उपाय म्हणून सोयीची अशी 1 जानेवारी ही तारीख निवडली गेलीय. 


सर्वांचीच व्यथा


रेकॉर्ड नसताना इस्लामिक कॅलेंडरप्रमाणे जन्मतारीख लक्षात ठेवणंही कठीण. त्यामुळे बऱ्याच अफगाणांनी 1 जानेवारी हिच आपली जन्मतारीख निवडली आहे. सर्वांचीच ही कथा असल्यामुळे कोणालाच त्यात वावगं वाटत नाही.