McDonalds : जगातील सर्वात मोठ्या फास्ट फूड कंपन्यांपैकी एक असणाऱ्या मॅकडॉनल्ड्सला सध्या एका अडचणीचा सामना करावा लागत आहे. ग्लोबल सप्लाय चेनमुळं जपानमध्ये चक्क फ्राईजची कमतरता जाणवू लागली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार फ्राईजचा तुटवडा जाणवू लागल्यामुळं यापुढं फक्त फ्रेंच फ्राईजचा स्मॉल पॅकचीच विक्री करेल. 


कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार फ्रेंच फ्राईज तयार करण्यासाठी वापर करण्यात आलेल्या बटाट्यांची आयात करण्यात आलेला माल पोहोचण्याठी दिरंगाई होत आहे. 


परिणामी 30 डिसेंबरपर्यंत जपानमध्ये फ्राईजचा केवळ स्मॉल पॅकच विक्री करण्यात येणार आहे. 


मिडीयम आणि लार्ज अशा कोणत्याच प्रकारच्या पॅकची विक्री करण्यात येणार नाही. 


मॅकडॉनल्ड्सनं दिलेल्या माहितीनुसार कॅनडातील वँकुवर येथे असणाऱ्या एका बंदरावरुन फ्राईजसाठीचे बटाटे येथे येतात. 


तिथंच पुरामुळं नुकसान झाल्यामुळं आणि महामारीमुळं जहाजंही निर्धारित वेळापत्रकापेक्षा उशिरानं चालत आहेत. 


यापूर्वीही आलेली अशीच अडचण 
जपानमध्ये अशी अडचण येण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2014 मध्ये अमेरिकेतील पश्चिम किनाऱ्यावर असणाऱ्या जवळपास 29 बंदरांवर 20 हजार डॉकवर्कर्स, टर्मिनल ऑपरेटर आणि शिपिंग लाईनमध्ये एक मोठा वाद सुरु झाला. 


याच कारणामुळं फ्रेंच फ्राईजचा तुटवडा जाणवला. तेव्हाही फक्त स्मॉल पॅकमधूनच जपानमध्ये फ्राईज विकले गेले होते.