जपान (मियाजारी) : आंब्यांचा राजा म्हटले की, आपल्याला आठवतो तो, हापूस. मधाप्रमाणे गोड आणि चवीला उतिशय उत्तम असणाऱ्या हापूसला आपल्या देशातच काय तर जगात सर्वत्र मागणी आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का? जगात असा ही आंबा आहे जो हापूस आंब्यापेक्षा ही महाग आहे. एवढेच नाही तर हा आंबा इतका गोड आणि चवीला सुंदर आहे की, तुम्ही हापूस आंबा सुद्धा विसरुन जाल. परंतु हा आंबा इतका महाग आहे की, याचे उत्पादक याला वाया घालवू शकत नाहीत. याच कारणांमुळे या आंब्यांच्या मागणी इतकीच याची लागवड ही केली जाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्या आंब्याबद्दल आम्ही बोलत आहोत, तो आंबा जपानमधील आंबा आहे. याची चव जगातील कोणत्याच आंब्याला नाही, म्हणून या आंब्याला स्वर्गगुटी असे ही म्हटले जाते. या आंब्याचे वजन 300 ग्रॅमपेक्षा जास्त असते. या आंब्याला जीअय टॅग सुद्धा मिळाला आहे. युरोप आणि जपानमध्ये याला खूप मागणी आहे.


ताईयो नो तामागो (taiyo no tamago)नावाच्या या आंब्याचे उत्पादन जपानच्या मियाजारी प्रांतात होत आहे. या आंब्याला अननस आणि नारळाची चव आहे. ही चवच या आंब्याला इतकं वेगळं आणि महाग बनवते. एवढेच नाही तर या आंब्याला सगळ्या आंब्यांपेक्षा वेगळा बनवणारी आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचा रंग.


<iframe allow="accelerometer; autoplay; encrypted-media; gyroscope; picture-in-picture" allowfullscreen="" frameborder="0" height="350" src="https://zeenews.india.com/marathi/video/expensive-mango-in-the-world/570934/embed


आंब्याला विशिष्ट रंग देण्यासाठी त्याला एका जाळीचा कपडा लावतात. ज्यामुळे या आंब्याच्या काही भागावरती ऊन पडते तर काही भागाचा उन्हाशी संबंध येत नाही. यामुळेच याला एक विशिष्ट रंग येतो.



ताईयो नो तामागो आंब्यांना जाळी लावण्याचे आणखी एक कारण म्हणजे, येथील लोकांचा असा विश्वास आहे की, झाडावरील फळ तोडल्याने त्याची चव बदलते. त्यामुळे हे फळ स्वत:हून तुटण्याची उत्पादक वाट पाहातात. यासाठी जाळी त्यांना मदत करते. जाळी लावल्याने आंबे खाली पडत नाही आणि ते जाळीतच राहातात. आंबा उत्पादनाची ही पद्धत देखील या आंब्याला सगळ्यात वेगळी ओळख देते.


 


त्याची किंमतही त्याच्या चवी इतकीच वेगळी आणि महाग आहे. बाजारात फळांच्या दुकानात हा ताईयो नो तामागो आंबा आढळत नाही, तर या आंब्याचा लिलाव होतो. लिलावात सर्वाधिक किंमत देणाऱ्या व्यक्तीकडे हा आंबा जातो.



सन 2017 मध्ये  ताईयो नो तामागोच्या दोन आंब्यांची किंमत सुमारे 2 लाख 72 हजार रुपये होती. हा एक आंबा सुमारे 350 ग्रॅम आहे. म्हणजेच एक किलोपेक्षा कमी आंब्यासाठी पाऊणे तीन लाख रुपयात हा आंबा विकला गेला.


१ हजार रुपयाला एक आंबा, झाडाला आंबा आला की बूक, हापूस नाहीय, तर कोणता आहे हा आंबा?


जापानी आंब्याची शेती आतापर्यंत जपानमध्येच होत होती पंरतु आता, अशी चर्चा आहे की, ही मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये या आंब्याची लागवड करण्यात आली आहे. एका शेतकऱ्याने आपल्या शेतात प्रयोग म्हणून हा आंब्याची लागवड केली होती. आता त्याचा असा दावा आहे की, या झाडाने फळ देण्यास सुरवात केली आहे.