Dream Job: `या` तरुणाला काहीच काम न करण्याचे मिळतात `इतके` पैसे
Japanese Man Story: 38 वर्षीय शोजी मोरिमोटो टोकियोमध्ये राहतो. त्याला ट्विटरवर 2.5 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात.
Japanese Man Story: शिक्षण झालं की आपण चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असतो. चांगल काम आणि खूप मेहनत केली की भरघोस पगार मिळतो, हे सर्वांना माहिती आहे. पण असाही एक तरुण आहे, ज्याला काम न करण्याचे पैसे मिळतात. हो. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल. पण या तरुणाला काहीच काम न करण्याचे पैसे मिळतात. काय आहे हा प्रकार? कोण आहे हा तरुण? लोकांना त्याला पैसे देणं कसं परवडतं? याबद्दल जाणून घेऊया.
सध्या एका जपानी तरुण सोशल मीडियावर चर्चेत आहे. या तरुणाची नोकरी अनेकांसाठी 'ड्रीम जॉब' ठरू शकते. टोकियोच्या या व्यक्तीचे नाव शोजी मोरिमोटो आहे. शोजी मोरिमोटोचे सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. शोजी स्वतःला भाड्याने देऊ करून पैसे कमवतो. प्रत्येक बुकिंगसाठी तो 10 हजार जपानी येन (अंदाजे रुपये 5,633) आकारतो. इतके पैसे घेऊनही तो काहीच करत नाहीत. ज्यांनी भाड्याने बुकिंग केले आहे ते शोजीसोबत बसतात.
38 वर्षीय शोजी मोरिमोटो टोकियोमध्ये राहतो. त्याला ट्विटरवर 2.5 लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. सोशल मीडियावरुन त्याला बहुतांश ग्राहकही मिळतात. त्याचा एक क्लायंट आहे, ज्याने शोजीला 270 वेळा कामावर घेतले आहे. शोजी स्वतःला भाड्याने देतो. 4 वर्षांपासून तो हे काम करत असून या वर्षांत त्याने सुमारे 4 हजार बुकिंग्स घेतल्या आहेत. क्लाइंटला जिथे जायचे आहे तिथे त्याच्यासोबत राहणे हे त्याचे एकमेव काम आहे.
शोजी फक्त सोबत राहतो आणि काहीही करत नाहीत. याचा अर्थ, जर कोणी त्याला कामावर ठेवलं तर तो फक्त त्याच्याबरोबर उपस्थित राहतो. ग्राहकाने त्याला थोडे जरी कामही दिले तर ते लगेच नकार देतो. एका क्लाइंटने त्याला फ्रीज कंबोडियाला नेण्याचे काम सांगितले पण त्याला त्याने नकार दिला.
एकदा तो 27 वर्षीय डेटा अॅनालिस्ट महिलेसोबत उपस्थित होता. खरं तर, त्या महिलेला सार्वजनिक ठिकाणी भारतीय पोशाख म्हणजेच साडी परिधान करायची होता पण तिला संकोच वाटत होता. त्यामुळे तिने मोरिमोटोला सोबती म्हणून बुक केले.
'ड्रीम जॉब' करण्यापूर्वी शोजी एका प्रकाशन कंपनीत काम करायचा. तिथे त्याला अनेकदा 'काहीच करत नाही' म्हणून खडसावले जायचे. तू काही कामाचा नाहीस असे म्हणत त्याचा बॉस शोजी ओरडला. बॉसचे हे वाक्य शोजीने खूपच मनावर घेतले आणि याचाच व्यवसाय बनवला. काम न करणे हेच त्याचा उत्पन्नाचे साधन आहे. यामुळे तो आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करतो. शोजी नक्की किती कमावतो हे सांगण्यास त्याने नकार दिला. कोरोना आधी तो 3 ते 4 क्लाइंटकडून बुकींग घ्यायचा पण आता तो दिवसाला 1-2 क्लायंटकडून बुकिंग घेतो, असे त्याने सांगितले.