Japanese techniques for happy peaceful life : शालेय वयात असताना उच्चशिक्षणासाठी मन लावून अभ्यास करण्यापासून पुढे मोठं झाल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी घ्यायचीये म्हणून वेळेचं आणि स्वत:च्या आवडीनिवडीचं भान न ठेवता मेहनत करणं असो. एक व्यक्ती म्हणून अनेकदा आपण जबाबदाऱ्यांखाली दबलो जातो. इतके, की त्यातून सावरणं कठीण होतं. जेव्हा गोष्टी लक्षात येतात तेव्हा मागं वळून पाहण्याचा वेळ नसतो, किंवा आपण तो पर्यायच पाहत नाही. तुम्हालाही असं वाटतं का? कधीकधी सगळ्याचाच कंटाळा येतो का? आपलं आयुष्य आनंददायी आणि शांततापूर्ण असावं असंच तुम्हालाही वाटतं का? तुमचं उत्तर हो असेल, तर ही माहिती नक्कीच वाचा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इथं आपण जगभरात चर्चेत असणारे आनंदी आणि शांततापूर्ण जीवनाचे जपानी तंत्र जाणून घेणार आहोत. यातलं पहिलं तंत्र आहे, 


किन्त्सुगी (Kintsugi)


ही एक अशी कला आहे, जिथं मातीची तुटलेली भांडी सोन्यानं व्यवस्थित केली जातात. काही गोष्टी व्यवस्थित नसल्या तरीही त्या सुंदर असतात याचंच हे प्रतीक. आयुष्य आणखी आनंदी आणि सुंदर होऊ शकतं याचाच हा संदेश. 


इकिगई (Ikigai)


जगण्याचा हेतू शोधण्याची ही जपानी पद्धत किंवा जपानी तंत्र. जपानमध्ये अशी धारणा आहे, की जगण्याच्या हेतूची कल्पना असणंही तुम्हाला एका आंददायी आयुष्याच्या मार्गावर नेते. त्यामुळं लहानमोठ्या कृतींतून जगण्याचा हेतू तुम्हाला गवसतोय का पाहाच. 


शिनरिन योकू (Shinrin Yoku)


वनांमध्ये स्नान करण्याची ही संकल्पना शब्दश: न घेता निसर्गाशी जवळीक साधत शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारावं हा यामागचा हेतू. कारण, निसर्गाहून उत्तम शिक्षक नाही. 


हेसुद्धा वाचा : IRCTC Tour Package : हीच ती वेळ हाच तो क्षण; रेल्वेकडून लडाख सफरीचं Superhit टूर पॅकेज जाहीर 


काईझेन (Kaizen)


हा शब्द किंवा ही संकल्पना सातत्यानं होणाऱ्या बदलांकडे लक्ष वेधते. स्वत:च्या आणि आपल्या आजुबाजूला असणाऱ्यांच्या जीवनात लहानमोठे बदल करत एका सुखी आयुष्याच्या दिशेनं जाण्यासाठी हे तंत्र मदत करतं. इथं लहान बदलांना प्रचंड महत्त्वं असतं. 


वाबी साबी (wabi sabi)


जगण्यामध्ये असणारा साधेपणा बऱ्याचदा सुखकर असतो आणि एक व्यक्ती म्हणून तो सातत्यानं तुम्हाला घडवत असतो असा संदेश हे तंत्र देतं. 


ओमोईयारी (Omoiyari)


आपल्यासोबत असणाऱ्यांच्या प्रयत्नांना दाद देत त्यांनाही पुढे नेण्यासाठीचा संदेश देण्याचं हे तंत्र. सोबतच्या व्यक्तींना प्रामाणिकपणे आणि समजुतदारपणे वागवणं आणि आपल्या मनाचा मोठेपणा दाखवणं हे आनंद देणारं आणि तितकंच सुखावणारं असतं.