बदलले सूर : Joe Biden यांचा Visa नियमांवरून घुमजाव
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयात बदल करण आता कठीण
वॉशिंग्टन : अमेरिका (America) च्या सत्ता परिवर्तनानंतर असं म्हटलं जात होतं की, राष्ट्रपतीची खुर्ची सांभाळल्यानंतर जो बायडेन (Joe Biden) ट्रम्प (Donald Trump) प्रशासनातील कडक नियम (Immigration Policies)लगेच बदलतील. मात्र, आता असं होताना दिसत नाही. बायडेन यांनी स्पष्ट केलं आहे की, या प्रक्रियेत काही महिन्यांचा कालावधी लागेल.
इथे महत्वाचा मुद्दा हा आहे की, निवडणूक प्रचाराच्यावेळी बायडेन यांनी जो शब्द दिला होता त्यावर आता ते स्पष्ट राहताना दिसत नाही. ट्रम्प यांचे कठोर नियम बदलण्याचा शब्द बायडेन यांनी दिला होता.
जो बायडेन यांनी मंगळवारी एका मुलाखतीत म्हटलं की, डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात तयार केलेले ViSa संबंधीचे नियम बदलण्यास काही काळाचा कालावधी लागेल. नवविर्वाचित राष्ट्रपतींनी म्हटलं की, यासाठी काही महिन्याचा कालावधी लागेल. घाईगडबडीत निर्णय घेतल्यामुळे स्थिती आणखी खराब होऊ शकते.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या Restrictive Asylum Policies वर बोलताना बाइडेन म्हणाले की, शरणार्थींबाबत मॅक्सिकन राष्ट्रपती आणि लॅटिन अमेरिकेत आमचे मित्र चर्चा करत आहेत. आपल्याला Asylum ला लगेचच थांबवायला हवे. सीमेवरील गोंधळांना रोखावं लागेल. या स्थितीने आता काम करणं गरजेचं आहे.
या अगोदर बाइडेन यांची डोमेस्टिक पॉलिसी सल्लागार सुसान राइस आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवनने देखील म्हटलं होतं की, VISA बाबत निर्णय घेण्यास थोडा कालावधी लागेल. दोघांनीही म्हटलं होतं की, गडबडीत निर्णय घेतल्यास समस्या निर्माण होतील.