काबूल : काबूल विमानतळ (Kabul Airport) हल्ल्याला अवघे 36 तास उलटताच अमेरिकेनं आयसीसचा (ISIS) बदला घेतलाय. अमेरिकेनं आयसीसच्या अड्ड्यांवर ड्रोन हल्ले केलेत. या हल्ल्यात बॉम्बस्फोटांचे सूत्रधार ठार झाल्याचा दावा केला जातोय. विशेष म्हणजे आयसीसला त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ असं जो बायडन यांनी ठणकावलं होतं. (Just 36 hours after the Kabul airport attack the United States has retaliated against ISIS) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अफगाणिस्तानातल्या (Afganistan) खूनी खेळात अमेरिका पुन्हा एकदा ऍक्शन मोडवर आलीय. त्याचाच ट्रेलर अमेरिकेनं दाखवलाय. नंगरहारमध्ये आससीस के च्या अड्ड्यांवर एअर स्ट्राईक करत अमेरिकेनं जशास तसं उत्तर दिलंय. या हल्ल्यात काबूल हल्ल्याचा मास्टर माईंड ठार झाल्याचा दावा करण्यात येतोय. हल्ल्यानंतर अमेरिकन लष्कराच्या सेंट्रल कमांडचे प्रवक्ता बिल अर्बन यांनी एक निवेदन जारी केलं. त्यात आयसीस के विरोधातली मोहीम फते झाल्याचं म्हंटलंय.



अमेरिकन सैन्यानं 'आयसीस के'च्या दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली. अफगाणिस्तानच्या नंगरहारमध्ये मानवरहित हवाई हल्ले करण्यात आले. आम्ही आमचं लक्ष्य गाठण्यात यश मिळवलंय. या कारवाईत एकही सामान्य नागरिक मारला गेलेला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.


काबूल हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन चांगलेच खवळलेत. दहशतवाद्यांपुढे अमेरिका झुकणार नाही, याचा बदला घेतला जाईल असं बायडन यांनी म्हंटलं होतं. त्यानुसार अमेरिकेनं अवघ्या 36 तासांत 'आयसीस के'चा बिमोड केलाय. 


अफगाणिस्तानातून अमेरिकेनं माघार घेतल्यानं तालिबान्यांचं फावलं. मात्र आयसीसनं अमेरिकेची खोडी काढून त्यांना डिवचलंय. त्यामुळं अफगाणिस्तानची पुन्हा रणभूमी होणार असंच दिसतंय.