Joe Biden : मोठी बातमी! जो बायडेन यांच्या घरावर FBI चा छापा; 12 तासांच्या झडतीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Joe Biden FBI Raid : एफबीआयने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या घराची एफबीआयने तब्बल 12 तास झडती घेतली असून मोठी कारवाई केली आहे. बायडेन यांच्या वकिलांनी याबाबत माहिती दिली आहे.
Joe Biden FBI Raid : अमेरिकेच्या न्याय विभागाने एफबीआयसह शुक्रवारी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्या डेलावेअरमधील विल्मिंग्टन येथील घराची झडती घेतल्याची माहिती समोर आली आहे. एफबीआयने जो बायडेन यांच्या निवासस्थानाची झडती घेत गोपनीय अशी सहा कागदपत्रे जप्त केली आहेत (joe biden secret document). एफबीआयने बायडेन यांच्या काही लिहिलेल्या नोट्सही ताब्यात घेतल्या आहेत. जो बायडन यांचे वकील बॉब बाऊर यांनी ही माहिती दिली. या कारवाईमुळे अमेरिकेत एकच खळबळ उडाली आहे.
न्याय विभागाने सुमारे 12 तास जो बायडेन यांच्या घराची झडती घेतली आहे. या झडतीदरम्यान जो बायडेन यांच्या यूएस सिनेटच्या कार्यकाळाशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. 1973 ते 2009 पर्यंत जो बायडेन यांनी डेलावेरमधून प्रतिनिधित्व केले होते. 2009 ते 2017 पर्यंत बराक ओबामा हे राष्ट्राध्यक्ष असताना जो बायडेन तिथे राष्ट्रपती होते. न्याय विभागाच्या पथकाने त्याकाळातील काही महत्त्वाची कागदपत्रेही ताब्यात घेतली आहेत.
बायडेन यांचे वकील बाऊरन यांनी सांगितले की, "न्याय विभागाने त्यांच्या तपासाच्या कक्षेत असणारी कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. यामध्ये चिन्हांकित केलेली गोपनीय कागदपत्रे आणि इतर वस्तूंचा समावेश आहे. यातील काही कागपत्रे ही सिनेट सदस्य आणि राष्ट्रपतींच्या काळाशी संबंधित आहेत."
बायडेन यांनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया
याबाबत झडतीनंतर जो बायडेन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "आम्हाला अनेक कागदपत्रे चुकीच्या ठिकाणी सापडली आहेत. आम्ही त्यांना तात्काळ न्याय विभागाकडे सुपूर्द केले आहे. आम्ही या प्रकरणात पूर्ण सहकार्य करत आहोत आणि लवकरच यातून बाहेर पडू," असे बायडेन म्हणाले. घराची झडती घेतली तेव्हा राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि त्यांची पत्नी घरी नव्हते. या कारवाईनंतर एफबीआय कोणते पाऊल उचलणार हे अद्याप समोर आलेले नाही.