वॉशिंग्टन: साखरी बॉम्बस्फोटाने काबुल हादरलं आहे. अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर काबुल विमानतळ आणि काही ठिकाणी आत्मघातकी हल्ले घडवून आणण्यात आले. हे स्फोड ISIS ने केल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे आता तालिबान विरुद्ध काबुल असा वाद उफळून येण्याची शक्यता आहे. या हल्ल्यात अमेरिकेचे 13 कमांडोंचा मृत्यू झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काबुल हल्ल्यावर बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बोलता बोलता थांबले आणि अचानक खाली वाकले. ते खूप भावुक झाले होते. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हाय़रल होत आहे. अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर पत्रकार परिषदे दरम्यानचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन भावुक झाल्याचं दिसलं. 


काबुलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात 90 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये अमेरिकेच्या 13 सैनिकांचा समावेश आहे तर 18 जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पत्रकार परिषदेत जो बायडन बोलताना निश:ब्द झाले. त्याने आपलं डोकं खाली झुकवलं...त्यानंतर त्यांचा आवाज भरल्यासारखा जाणवत होता. बायडन भावुक झाले होते.



 या हल्ल्याचा बदला नक्की घेणार असा इशाराही त्यांनी यावेळी ISISला दिला आहे.  बायडेन म्हणाले पुढे म्हणाले की, ISIS ला त्याची मोठी आणि जबर किंमत मोजावी लागेल. ही जखम आम्ही विसरणार नाही. आम्ही प्रत्येक दहशतवादी शोधून त्यांना ठार मारु. 


काबूल विमानतळावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात ठार झालेल्या अमेरिकन सैनिकांच्या मृत्यूबद्दल अमेरिकेने शोक व्यक्त केला आहे आणि व्हाईट हाऊसवरील आपला झेंडा खाली केला आहे. माहिती देताना प्रेस सेक्रेटरीने सांगितले की 30 ऑगस्टपर्यंत अमेरिकन ध्वज खाली ठेवला जाईल.