बीजिंग : काश्मीर प्रश्न भारत आणि पाकिस्ताननं चर्चेने सोडवावा असं आवाहन चीननं दोन्ही देशांना केलाय. या मुद्याची दखल संयुक्त राष्ट्राने घ्यावी या इस्लामिक सहकार्य संघटना अर्थात ओआयसीची मागणीही चीनने फेटाळून लावलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काश्मीरबाबत संयुक्त राष्ट्राचा ठराव लागू करण्यात यावा ही ओआयसीची मागणी आहे. पाकिस्तान या संघटनेचा सदस्य देश आहे.. त्यामुळे या ठरावाची अंमलबजावणीची मागणी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद अब्बासी यांनी केली होती. 


मात्र काश्मीरबाबात आपले धोरण स्पष्ट असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लू कांग यांनी स्पष्ट केलंय. वन बेल्ट, वन रोडबाबत चीन चिंतीत आहे. त्यामुळे त्यांच्या धोरणात बदल झाल्याचं बोललं जातंय.