केनिया : प्रत्येक समाजाच्या चालीरीती वेगवेगळ्या ठिकाणी भिन्न आहेत, परंतु यातील काही प्रथा अशा आहेत की त्यावर विश्वास ठेवणे सोपे नाही. पश्चिम केनियाच्या लुओ जनजातीच्या अशाचं काही विचित्र प्रथा आहेत. जन्म, मृत्यू, लग्नापासून सेक्सपर्यंतच्या त्यांच्या परंपरा खूप विचित्र आहेत. आताच्या जगात आजही अशा प्रथा काही जमाती पाळतात या गोष्टीची मोठा धक्का बसतो. पश्चिम केनियामध्ये पतीच्या मृत्यूनंतर पत्नीचं शुद्धीकरण केलं जातं. प्राचीन प्रथेनुसार पत्नीला पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहासोबत एक रात्र झोपावं लागतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दरम्यान, पत्नीला कल्पना करावी लागते की ती तिच्या पतीवर प्रेम करत आहे. असे मानले जाते की यानंतर तिच्या मृत पतीचा आत्मा मुक्त होतो आणि यानंतर असे मानले जाते की स्त्री शुद्ध झाली आहे आणि ती पुन्हा लग्न करू शकते. लुओ जमातीमध्ये, जर पती -पत्नीमध्ये भांडण झाले, तर स्त्रिया आपल्या पतीला काठीने मारू शकत नाहीत, जर असे झाले, तर यानंतर एक विशेष विधी केला जातो.



संबंधिक विधी घरातील आणि समाजातील वडीलधारी करतात. विधी दरम्यान, पती -पत्नीला 'हर्बल ड्रिंक' दिले जाते. या पेयाला 'मन्यासी' म्हणतात. यानंतर दोघांना सेक्स करण्यास सांगितले जाते. या मागे एक विश्वास आहे की असे केल्यावर पती -पत्नीमधील तणाव संपेल. एवढंच नाही तर आजच्या युगात बहुतेक सुसंस्कृत देशांमध्ये एकापेक्षा जास्त विवाह हा गुन्हा मानला जात असला तरी लुओ जमाती अजूनही त्याबद्दल अनभिज्ञ आहे. 


लुओ जमातीमध्ये एकापेक्षा जास्त लग्नांची प्रथा अजूनही आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, पहिली पत्नीसुद्धा पतीचं दुसरं लग्न सहजपणे स्वीकारते. लुओ टोळीच्या आणखी एका प्रथेनुसार, नवीन वधू आणि वर लग्नानंतर तोपर्यंत संबंध ठेवू शकत नाहीत जोपर्यंत मुलाचे आई-वडिल नवीन पती-पत्नीच्या खोलीत शारीरिक संबंध ठेवत नाहीत.