कट्टर विरोधकांचे हस्तांदोलन, उत्तर कोरिया - दक्षिण कोरियाचे ऐतिहासिक नवीन पर्व
कट्टर विरोधक असणारे एकमेकांशी युद्धाची भाषा करणाऱ्या देशांच्या प्रमुखांनी हस्तांदोलन केले. उत्तर कोरिया - दक्षिण कोरियाचे ऐतिहासिक नवीन पर्व सुरु झालेय.
पानुनजॉम, कोरिया : तब्बल ६५ वर्षानंतर दक्षिण आणि उत्तर कोरियाचे प्रमुख एकमेकांच्या सीमा ओलांडून हस्तांदोलन करतानाची दृश्यं आज जगभरात चर्चेचा विषय ठरली आहेत. आज सकाळी उत्तर कोरिया हूकूमशाह किम जॉन उन आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून जे इन यांनी हस्तांदोन केलं. त्यानंतर उत्तर कोरियाचा हूकूमशाह किम जॉन ऊन दक्षिण कोरियाची सीमा ओलांडून त्यांच्या देशात गेला.
(Reuters photo)
तिथे मून जे इन यांच्या सोबत आलेल्या प्रतिनिधींशी ओळख करून घेतली. त्यानंतर दोन्ही नेते उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यातील लष्करमुक्त भूभागावर वसलेल्या पानुनजॉम या छोट्याशा गावात आले असून तिथेच दोन्ही देशांमध्ये आंतरकोरिया शिखर परिषदेला आजपासून सुरुवात होतेय. दोन्ही राष्ट्रांमध्ये शांती प्रस्थापित करणे हा या शिखर परिषदेचा उद्देश असून...अण्वस्त्रमुक्तीसाठी दक्षिण कोरियाचा आग्रह आहे.