Queen Elizabeth II Death : सध्या जगभरातून राणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांच्या निधनाच्या वृत्तानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. दीर्घकाळ आपल्या अधिकारांअंतर्गत राणीपदावर असणाऱ्या या राणीची ख्याती काही औरच. संपूर्ण जगासाठी एलिझाबेथ म्हणजे एक राणी, पण किंग चार्ल्स (King Charles III) यांच्यासाठी मात्र ती फक्त आई..... एक मैत्रीण.... एक सल्लागार. आयुष्यातील बऱ्याच निर्णय़ांच्या वेळी त्यांना सतर्क करणारी आणि वेळीत रागे भरणारी आई. याच आईच्या निधनानंतर चार्ल्स यांनी राज्यकारभाराची धुरा हाती घेतली. पण, त्यांच्या मनातील दु:ख मात्र लपलं नाही. 
 
ब्रिटनमध्ये राणीच्या निधनानंतर राज्यकारभाराची सूत्र हाती घेत प्रिन्स चार्ल्स आता King Charles III म्हणून जगासमोर आले. यावेळी त्यांनी राजा म्हणून पहिल्यांदाचा संबोधनपर भाषण केलं. जेव्हा त्यांच्या मनात राणी एलिझाबेथ यांच्याविषयीचा आदर आणि अमाप प्रेम समोर आलं. 


काय म्हणाले किंग चार्ल्स III?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘माझी प्रिय आई.....(Darling Mama), तू आता माझ्या प्रिय, स्वर्गीय वडिलांना त्यांच्या प्रवासात साथ देण्यासाठी जात आहेस. मी फक्त इतकंच बोलू इच्छितो..... Thank You.  


आतापर्यंतच्या सर्वकाळात तू आपल्या आणि देशवासियांच्या कुटुंबीयांप्रती दाखवलेल्या प्रेम आणि समर्पकतेबद्दल मी तुझा आभारी आहे.’


आपली आई एक राणी होती आणि तिनं या पदाचा मान ठेवत त्यासाठी बऱ्याग गोष्टींचा त्याग केला, काळानुरुप तिची त्यागाची परिभाषा कधीच बदलली नाही असंही किंग चार्ल्स म्हणाले. यावेळी त्यांच्या मनाची हळवी बाजू संपूर्ण जगानं पाहिली.  
 
राणी एलिझाबेथ यांनी त्यांच्या मुलांना कायमच राजघराण्याची प्रतिष्ठा कुठेही मलीन होणार नाही, अशा कृत्त्यांपासून परावृत्त केलं. मुलं जिथं चुकली तिथं त्यांनी शासनही घडवून आणलं. मुलांच्या चुकीवर पांघरूण घालणाऱ्यांपैकी त्या एक नव्हत्या. कित्येकदा या नात्याची ही बाजूही समोर आली, पण तरीही आईचा शब्द उजवा मानत चार्ल्स आणि त्यांच्या इतरही भावंडांनी आपल्या जबाबदाऱ्या ओळखल्या. (Queen Elizabeth II children)



राणी एलिझाबेथ II यांच्या निधनानंतर आता लगेचच प्रिन्स चार्ल्स यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली. ही जबाबदारी म्हणजे ब्रिटनच्या (Britain) सिंहासनाची. संपूर्ण जगातचं लक्ष असणाऱ्या या राजघराण्याकडून आता एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे आणि याचे साक्षीदार जगभरातील नागरिक होत आहेत. या साऱ्यामध्ये एका आई- मुलाचं नातं सर्वांची मनं जिंकून जात आहे.