मुंबई : तुम्हालाही बाटाचे शूज किंवा चप्पल परिधान करणं पसंत असेल... पण, 'बाटा' ही काही भारतीय कंपनी नाही, हे तुम्हाला माहीत आहे का?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

होय, १८९४ मध्ये झेक प्रजासत्ताक देशात या कंपनीनं आपल्या वाटचालीला सुरुवात केलीय. या कंपनीचे संस्थापक थॉमस बाटा यांचा १९३२ मध्ये एका विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या १८ वर्षांच्या मुलानं त्यांचा व्यवसाय पुढे नेला. 


ज्युनिअर बाटा कंपनीच्या विस्तारासाठी १९३५ मध्ये कराचीवरून कोलकातामध्ये दाखल झाले. १९३० मध्ये भारतात चप्पलची कोणतीही कंपनी नव्हती. भारतात चप्पला जपानहून आयात केले जात होते. 


१९३९ मध्ये बाटा यांनी कोलकातामध्ये शूज बनवणं सुरू केलं. भारतीयांना त्यांचं हे प्रोडक्ट आवडलं.... आणि दर आठवल्याला जवळपास ३५०० शूजचे जोड विकले जाऊ लागले. यानंतर बाटा यांनी पाटणामध्ये लेदर फॅक्ट्री सुरू केली. हा भाग आता बाटागंज नावानं ओळखला जातो. 


आता 'बाटा'चे १८ देशांत २३ मॅन्युफॅक्टरिंग युनिटस् आहेत. २००४ मध्ये 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड'नं बाटाला जगातील सर्वात मोठी शूज मॅन्युफॅक्चरर आणि रिटेलर म्हणून घोषित केलं.