The Last road On Earth:  जग कुठे संपतेय, जगाचे शेवटचं टोक कुठे आहे असे प्रश्न फक्त लहान मुलांनाच नाही तर सगळ्यांच्याच  मनात कधी ना कधी तरी येत असतात. जगाचे शेवटचे टोक कुठे आहे हे माहिती नसले तरीही जगाचा शेवटचा रस्ता कोणता हे निश्चित झाले आहे. या रस्त्याला जगातील अखेरचा रस्ता मानले जाते. या रस्त्यानंतर जग संपत असल्याचे देखील मानले जाते. पृथ्वीवरील या शेवटच्या रस्त्याचे नाव ई-69 असे आहे.(Last road on earth is E 69 highway in north pole world ends here).


'या' देशात आहे जगातील शेवटचा रस्ता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 ई-69  हा  पृथ्वीवरील शेवटचा आणि सर्वात डेंजर रस्ता मानण्यात येते. ई-69 एक महामार्ग आहे. हा महामार्ग 14 किलोमीटर लांबीचा आहे. या महामार्गावर अशी अनेक ठिकाणे आहेत, जेथे एकटय़ाने पायी चालण्यास किंवा वाहनाने प्रवास करण्यास मनाई आहे. पृथ्वीवरील शेवटचा आणि सर्वात डेंजर रस्ता नॉर्वे देशात आहेत. नॉर्वेचे हे देश जगातील शेवटचा देश असून या देशातील  ई-69 हा पृथ्वीवरचा शेवटचा  रस्ता मानला जातो. 


या रस्त्याच्या पुढे कुठलाच रस्ता जात नाही


ई-69 रस्ता हा पृथ्वीचे टोक आणि नॉर्वेला जोडणार आहे. या रस्त्याच्या पुढे कुठलाच रस्ता जात नाही.  हा रस्ता संपल्यानंतर पुडे फक्त  बर्फ आणि समुद्रच समुद्र दिसून येतो. जगातील अखेरचा रस्ता असल्याने अनेक पर्यटकांना हा रस्ता पाहण्याची इच्छा असते. पण, या रस्त्यावरुन प्रवास करणे इतके सहज शक्य नाही. या रस्त्यावर  एकटय़ाने जाणे किंवा ड्रायव्हिंग करण्यावर बंदी आहे. जर जगातील अखेरच्या रस्त्याची सैर करायची असेल तर चार पाच जणांच्या ग्रुप सोबतच जावे लागेल. त्याशिवाय या रस्त्यावर प्रवास करण्याची परवानगी दिली जात नाही. येथे सर्वत्र बर्फच बर्फ असल्याने प्रवासी हमखास वाट चुकतात. याचबरोबर तेथे कडाक्याची थंडी असते. यामुळे या 14 किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावर कुणीच एकटा जात नाही.