लाहोर : मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड ( Mumbai attack mastermind) लष्कर-ए-तोयबाचा ऑपरेशन्स कमांडर  (Lashkar-e-Taiba operations commander) झाकी उर रहेमान लकवी (Zaki-ur-Rehman Lakhvi ) याला पाकिस्तानात 15 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तो 2015 पासून जामिनावर होता. (LeT leader Zaki-ur-Rehman Lakhvi sentenced to 15 years in jail in terror financing case)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहशतवादी कारवायांबाबत झालेल्या 3 खटल्याममध्ये तो दोषी आढळला असून लाहोरमधील दहशतवादविरोधी विशेष न्यायालयाने प्रत्येक गुन्ह्यासाठी पाच-पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्याला 3 लाख रुपयांचा दंडही करण्यात आला आहे.


संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत असलेला लकवी पाकिस्तानात राजरोज वावरतोय. आता शिक्षा ठोठावल्यानंतर त्याची अंमलबजावणी पाकिस्तान करणार की पुन्हा एकदा भारताविरोधात कारवाया करण्यासाठी त्याला मोकाट सोडणार, हा प्रश्न आहे.