नवी दिल्ली : चोरी करण्यासाठी चोर नेहमीच वेगवेगळी शक्कल लढवत असतात. पण, या घटनेतील चोरट्याने भलतीच शक्कल लढवली आणि तिसुद्धा एका वेगळ्याच वस्तूच्या चोरीसाठी. खरे तर, या चोरट्याने चोरलेली ही वस्तू वस्तू नसून पदार्थ आहे. त्यातही विशेष असे की, ही चोरी करण्यासाठी चोरट्याने चक्क सिंहाचे रूप परिधान केले. सिंहाचा मुखवटा आणि अंगावर सिंहाच्या त्वचेसारखे कपडे परिधान करून चोरीसाठी आला होता.


पोलिसानी सुरू केला तपास


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घटना आहे ऑस्ट्रेलियातील. येथील एका बिल्डिंगमध्ये एक चोर घुसला आणि त्याने चोरले काय तर, चॉकलेट्स आणि काही किरकोळ इलेक्ट्रॉनिक वस्तू. या विचित्र चोरीचे सीसीटीव्ही फुटेज व्हिक्टोरिया पोलिसांना (Victoria Police) मिळाले असून, त्यांनी या चोराचा तपासही सुरू केला आहे. इतक्या किरकोळ गोष्टीच्या चोरीसाठी त्याने इतकी वेशभुषा का केली असावी, याबाबत पोलिसांना संशय आहे.


चोराने ठेवली नाही शेपटीचीही कसर


सीसीटीव्ही पाहताना पहिल्यांदा तुम्ही कदाचित घाबरण्याची शक्यता आहे.पण, लगेच तुमच्या लक्षात येईल की, हा खराखुरा सिंह नाहीच मुळी. हा तर एक माणूसच आहे. दरम्यान, समाजमाध्यमांमध्ये (सोशल मीडिया) हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. गंमत अशी की सिंहाचे कपडे घालून आलेल्या या चोराने मागे शेपटीचीही कसर ठेवली नव्हती.



दरम्यान, पोलिसांना संशय आहे की, या व्यक्तिसोबत आणखी एक व्यक्ती असून त्यांनी चॉकलेटसोबतच इलेक्ट्रॉनिक वस्तूही चोरल्या आहेत.